बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असे अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिर उभारण्याचे (Ayodhya Shri Ram Mandir) कार्य सुरु आहे. या दरम्यान २२ डिसेंबर रोजी रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा होणार आहे. त्याविषयी जगभरातील हिंदूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विश्व हिंदू परिषद आता हा सोहळा जगभरातील हिंदूंना पाहता यावा, यासाठी तयारी करत आहे. जगभरातील तब्बल ६१ देशांमधील हिंदू हा सोहळा पाहू शकतील, अशी व्यवस्था विहिंप करत आहे.
(हेही वाचा Ayodhya: अयोध्येत विविध ठिकाणी ‘रामायण’ मालिकेचे प्रसारण सुरू, नागरिकांची रस्त्यावर मोठ्या संख्येने गर्दी)
22 जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पूजाअर्चना करण्याचे आवाहन
हा सोहळा जपानपासून अलास्कापर्यंत, अमेरिकेपासून इंग्लंडपर्यंत आणि सिंगापूरपासून मलेशियापर्यंत सर्वत्र हिंदू बांधवांना या सोहळ्याचा आनंद घेता येणार आहे, असे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे म्हणाले. नोव्हेंबरमध्ये बँकॉक येथे वर्ल्ड हिंदु काँग्रेसची परिषद झाली. त्यावेळी संपूर्ण जगातील ६१ देश तिथे आले होते. या सर्व देशांनी आपापल्या ठिकाणी कार्यक्रम आयोजन करणार असल्याचे सांगितले. याशिवाय जग्गी वासुदेव, चिन्मय मिशन, श्री श्री रविशंकर, रामकृष्ण मठ, अम्मा, स्वामीनारायण मंदिर, इस्कॉन यांचे जगभरात आश्रम आहेत. या सर्व आश्रमातही रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे (Ayodhya Shri Ram Mandir) प्रक्षेपण आणि कार्यक्रम केले जाईल, असेही विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त सरचिटणीस जी. स्थाणुमालयन म्हणाले. २२ जानेवारीला प्रत्येकाने सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पूजाअर्चना करावी, असे आवाहन जी. स्थाणुमालयन यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community