Ayodhya: मुंबईहून अयोध्येसाठी लवकरच विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार, सविस्तर वेळापत्रक वाचा

305
Ayodhya: मुंबईहून अयोध्येसाठी लवकरच विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार, सविस्तर वेळापत्रक वाचा
Ayodhya: मुंबईहून अयोध्येसाठी लवकरच विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार, सविस्तर वेळापत्रक वाचा

प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामललाच्या दर्शनाकरिता अयोध्येत (Ayodhya) भाविकांची गर्दी वाढत आहे. अनेक भाविक-भक्त मुंबईहून अयोध्येला जात आहेत. त्यांच्या सोयीसाठी मुंबईहून अयोध्येसाठी लवकरच विशेष रेल्वेगाड्या (Special trains) सोडण्यात येणार आहेत. यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेचे नियोजन सुरू आहे. जाणून घेऊया, रेल्वेने प्रवासाचा मार्ग आणि प्रत्येक माणसी किती खर्च अपेक्षित आहे.

मुंबईहून अयोध्येला (Ayodhya) रेल्वेने जाण्यासाठी सुमारे १,५९० किमी अंतर प्रवास करावा लागतो. रेल्वेने प्रवास करताना साधारणपणे ६०० रुपये ते ५ हजार रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. येथे रेल्वेने अयोध्या गाठायची असल्यास मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानक गाठावे लागेल.

(हेही वाचा – Ramdas Kadam: उद्धव ठाकरे बापाशी गद्दारी करणारा मुलगा, रामदास कदम यांची जहाल टीका)

गाडी क्रमांक २२१८३ एलटीटी
अयोध्या साकेत एक्स्प्रेस (Ayodhya Saket Express) एलटीटीवरून दर बुधवारी, शनिवारी सकाळी ६ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता पोहचते. अयोध्येला पोहोचण्यासाठी सुमारे २६ तास लागतात. ही एक्स्प्रेस यादरम्यान २० थांब्यावर थांबा घेते. साकेत एक्स्प्रेसच्या शयनयानचे तिकीट भाडे ५९५ रुपये आहे. तर, तृतीय श्रेणी वातानुकूलितचे भाडे १,६०५ रुपये, द्वितीय श्रेणी वातानुकूलितचे भाडे २,३५० रुपये आहे.

गाडी क्रमांक २२१२९ एलटीटी
अयोध्या तुलसी एक्स्प्रेस एलटीटीवरून दर मंगळवारी, रविवारी सकाळी ६ वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता अयोध्याला पोहचते. अयोध्येला पोहोचण्यासाठी सुमारे ३० तास १० मिनिटे लागतात. तुलसी एक्स्प्रेस यादरम्यान २८ थांब्यावर थांबा घेते. तुलसी एक्स्प्रेसच्या शयनयानचे तिकीट भाडे ६९५ रुपये, तृतीय श्रेणी वातानुकूलितचे भाडे १,८२५ रुपये, तर द्वितीय श्रेणी वातानुकूलितचे भाडे २,६२५ रुपये आहे.

गाडी क्रमांक २२१०३ एलटीटी अयोध्या एक्स्प्रेस दर सोमवारी एलटीटी
अयोध्येदरम्यान धावते. एलटीटी येथून दुपारी १.३५ वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता पोहोचते. अयोध्येला पोहोचण्यासाठी सुमारे २७ तास ५५ मिनिटे लागतात.

(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून आसामला ११ हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा)

अयोध्येला जाण्याचा प्रवास सुकर कसा होईल?

– यापैकी काही रेल्वेगाडयांना अयोध्याला थांबा आहे. तर, काहींना बस्ती, गोंडा, गोरखपूर रेल्वे स्थानकाला थांबा आहे. या स्थानकावरून रेल्वे, रस्ते मार्गाने अयोध्या गाठता येणार आहे.

– गाडी क्रमांक ०२५९८ एलटीटी – गोरखपूर विशेष एक्स्प्रेस

– गाडी क्रमांक १५१०२ एलटीटी – छाप्रा, छाप्रा अंत्योदय एक्स्प्रेस

– गाडी क्रमांक १५०६८ वांद्रे – गोरखपूर, गोरखपूर साप्ताहिक एक्स्प्रेस

– गाडी क्रमांक २२५३८ एलटीटी – गोरखपूर, कुशीनगर एक्स्प्रेस

– गाडी क्रमांक २२९२१ वांद्रे – गोरखपूर, गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस

– गाडी क्रमांक २०१०३ एलटीटी – गोरखपूर, गोरखपूर एक्स्प्रेस

– गाडी क्रमांक १२५९८ सीएसएमटी – गोरखपूर, गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस

– गाडी क्रमांक ११०७९ एलटीटी – गोरखपूर, गोरखपूर एक्स्प्रेस

– गाडी क्रमांक १५०६६ पनवेल – गोरखपूर, गोरखपूर एक्स्प्रेस

– गाडी क्रमांक १९०३७ वांद्रे – बरौनी, अवध एक्स्प्रेस

– गाडी क्रमांक ११०५९ एलटीटी – छाप्रा, छाप्रा एक्स्प्रेस

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.