- प्रतिनिधी
देशातील नागरिकांनी आयुर्वेद स्वीकार करावा आणि निरोगी राहावे, यासाठी आयुष मंत्रालयाच्यावतीने विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धतीशी जोडण्याकरिता आयुष मंत्रालयाकडून (Ayush Ministry) नागरिकांच्या प्रकृतीचे निरिक्षण केले जाणार आहे. आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, आयुर्वेद उपचार पध्ततीच्या माध्यमातून लोकांना सुदृढ आरोग्य मिळावे यासाठी आयुष मंत्रालयाकडून प्रकृतीचे निरिक्षण करण्यात येणार आहे. संविधान दिवस 26 नोव्हेंबरपासून ते 25 डिसेंबरपर्यंत ही मोहिम राबविली जाणार असून जवळपास एक कोटी नागरिकांच्या प्रकृतीची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्वप्रथम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रकृतीचे परिक्षण केले जाणार आहे.
(हेही वाचा – Sanjay Raut यांनी उडवली Prakash Ambedkar यांची खिल्ली!)
जाधव म्हणाले की, मनुष्यामध्ये वात, पित्त, कफ अशा सात प्रकारच्या प्रकृती आढळून येतात. आपली प्रकृती कोणत्या प्रकारची आहे कळले तर काय करावे आणि काय करू नये, दिनचर्या आणि ऋतुचर्या कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले जाऊ शकते. यामुळे आयुष मंत्रालयाने (Ayush Ministry) एक कोटी नागरिकांचे प्रकृती निरिक्षण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जीवनात लहान-लहान बदल करून आपण निरोगी जीवन प्राप्त करू शकतो, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेद दिवसाला ‘देश का प्रकृती परिक्षण’ मोहिमेची सुरुवात केली होती.
(हेही वाचा – राहुल गांधी, खरगे आणि सुप्रिया श्रीनेट यांच्या विरोधात १०० कोटींचा दावा ठोकणार; Vinod Tawde यांचा इशारा)
प्रकृतीचे निरिक्षण करण्यासाठी आयुर्वेदिक महाविद्यालयातील एक लाख 35 हजार विद्यार्थी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे 20 हजार विद्यार्थी, 18 हजार प्राध्यापक, तीन लाख डॉक्टर आणि अन्य असे चार लाख 70 हजार स्वयंसेवकांच्या माध्यमातून ही मोहिम यशस्वी केली जाणार आहे. प्रकृतीचे परिक्षण करण्याची इच्छा असलेल्यांना ॲप डाउनलोड करावा लागणार आहे. यानंतर स्वयंसेवक त्यांच्या घरी जाऊन प्रकृतीचे परिक्षण करतील, असे जाधव यांनी सांगितले. या मोहिमेच्या माध्यमातून पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनविण्याची योजना आहे. (Ayush Ministry)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community