Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढवणार, विमा रक्कमही होणार दुप्पट

Ayushman Bharat : ७० वर्षांवरील सर्व नागरिकांना आयुष्मान भारत विमा योजनेचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.

145
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढवणार, विमा रक्कमही होणार दुप्पट
  • ऋजुता लुकतुके

देशात सर्वांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३ वर्षांत आतापेक्षा दुप्पट लोकांना विमा संरक्षण मिळेल असं पीटीआयने आपल्या बातमीत म्हटलं आहे. त्याचबरोबर विम्याची रक्कमही वाढणार आहे. देशातील ७० वर्षांवरील सर्व नागरिकांना आयुष्मान योजनेअंतर्गत आणण्यात येईल. तसंच विमा कवचही ५ लाख रुपयांवरून १० लाख रुपयांवर आणण्यात येईल. (Ayushman Bharat)

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने यावर एक अहवाल तयार केला असून नवीन तरतुदींसाठी १२,०७६ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सरकारवर पडणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पुढील महिन्यात अर्थसंकल्पादरम्यान या सुधारणांची घोषणा होईल, असंही पीटीआयने म्हटलं आहे. (Ayushman Bharat)

(हेही वाचा – Worli Hit and Run Case : मुख्य आरोपी मिहीर शहा याच्या विरुद्ध लुकआउट नोटिस जारी)

२०२४ साली आयुष्मान योजनेसाठी केंद्र सरकारने ७,२०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. १२ कोटी कुटुंबांना या योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळतं. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयुष्मान भारतची व्याप्ती वाढवून ७० वर्षांवरील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ४ ते ५ कोटींनी वाढणार आहे. महागाई दर चढा असल्यामुळे महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरिबांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (Ayushman Bharat)

नीती आयोगाने २०२१ च्या अहवालापासून देशात लोकांकडे पुरेसं विमा संरक्षण नसल्याचं वास्तव वारंवार मांडलं आहे. सध्यापेक्षा ३० टक्के जास्त लोकसंख्येला विमा कवच मिळावं, असं नीती आयोगाने म्हटलं आहे. (Ayushman Bharat)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.