आता 70 वर्षांवरील सर्वांसाठी आयुष्यमान कार्ड – Ashwini Vaishnav

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय

239
आता 70 वर्षांवरील सर्वांसाठी आयुष्यमान कार्ड - Ashwini Vaishnav

देशात आता 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व वृद्धांना आयुष्मान आरोग्य योजनेंतर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी दिली.

(हेही वाचा – सुशीलकुमार शिंदे यांनी केले Veer Savarkar यांचे कौतुक)

यासंदर्भात वैष्णव (Ashwini Vaishnav) म्हणाले की, या निर्णयामुळे 12.3 कोटी कुटुंबांना फायदा होणार आहे. याचा फायदा 6.5 कोटी वृद्धांना होणार आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ही एक नवीन श्रेणी असेल. या अंतर्गत सरकार 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधेसह आरोग्य विमा देणार आहे. तसेच 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज असेल.

(हेही वाचा – Cement Concrete Road : रस्त्याचा दर्जा, गुणवत्ता राखण्यासाठी आयआयटीची नियुक्ती)

एकूण 12.3 कोटी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. जी कुटुंबे आधीच आयुष्मान भारत योजनेचा भाग आहेत, त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती 70 वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्यास, त्यांना वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त टॉप-अप मिळेल. हे शेयर्ड आरोग्य कवच असेल असे वैष्णव (Ashwini Vaishnav)  यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.