स्टार्ट अपमध्ये भारत अग्रेसर; प्रतिदिन 80 स्टार्ट अप

80

गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये स्टार्टअप हा चर्चेचा विषय बनला आहे. नावीन्यता आणि उद्योजकतेतून भारत आपली प्रगती साधत आहे. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना, देशातील स्टार्टअपची संख्या 75 हजारांवर पोहचण्याचा योग जुळून आला आहे. दररोज नोंदणी होणा-या स्टार्टअपची संख्याही जगात भारतात सर्वाधिक असून देशात सध्या प्रतिदिन 80 स्टार्टअपची नोंद होत आहे. देशात स्टार्टअप तसेच नवकल्पनांना खतपाणी घालण्यासाठी अनुकूल वातावरण तयार केले जात असून, त्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्यासाठीचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला आहे.

गेल्या सहा वर्षांमध्ये या कृती आराखड्यामुळे अनेक जणांना यशस्वी स्टार्टअपची उभारणी करता आली. तसेच भारत जगातील तिस-या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था ठरण्यासाठीही कृती आराखड्याचा उपयोग झाला. देशात सुरुवातीच्या 10 हजार स्टार्टअप्ससाठी 808 दिवसांचा कालावधी लागला. मात्र, शेवटचे 10 हजार 156 दिवसांत नोंदवले गेले.

( हेही वाचा: शालेय पोषण आहारासाठी ‘आधार कार्ड’ अनिवार्य )

या योजनेतून आर्थिक मदत केली जाते

केंद्र सरकारकडून 1 एप्रिल 2021 पासून स्टार्टअप भारत बीजनिधी योजना सुरु करण्यात आली. या योजनेतून मान्यताप्राप्त स्टार्टअप संकल्पनांचा पाठपुरावा, उत्पादनांच्या चाचण्या, व्यावसायीकरण आदींसाठी आर्थिक मदत करण्यात येते. त्यामुळे स्टार्टअप गुंतवणूक आकर्षित करण्यात किंवा बॅंकांकडून कर्ज घेण्यात सक्षम होत आहेत. देशाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडून स्टार्टअपना मान्यता दिली जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.