केंद्र सरकारने मंगळवारी 1992 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी बी श्रीनिवासन (B Srinivasan) यांची राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केली. बी श्रीनिवासन, 1992 च्या बॅचचे बिहार केडरचे आयपीएस अधिकारी नलिन प्रभाकर यांची जागा घेतील. नलिन प्रभाकर (Nalin Prabhakar) यांची आता जम्मू-काश्मीरचे विशेष पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (B Srinivasan)
सरकारने आपल्या आदेशात काय म्हटले आहे?
कार्मिक मंत्रालयाच्या आदेशानुसार मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने श्रीनिवासन यांची एनएसजीचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. त्यांची नियुक्ती पदभार स्वीकारल्यापासून 31 ऑगस्ट 2027 पर्यंत म्हणजेच निवृत्तीच्या तारखेपर्यंत असेल. (B Srinivasan)
(हेही वाचा – prince of wales museum आहे तरी कुठे आणि काय आहे खासियत?)
नलिन प्रभात यांना नवीन जबाबदारी मिळाली
आंध्र प्रदेशचे 1992 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी प्रभाकर 30 सप्टेंबर रोजी आरआर स्वेन यांच्या निवृत्तीनंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे विशेष डीजी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. केंद्राने NSG महासंचालक नलिन प्रभाकर यांचा कार्यकाळ कमी केला आहे आणि आंध्र प्रदेशातून केंद्रशासित प्रदेश (AGMUT) कॅडरमध्ये त्यांच्या आंतर-कडर प्रतिनियुक्तीची व्यवस्था तीन वर्षांसाठी केली आहे. (B Srinivasan)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community