सांगली, अमरावती आणि जालन्यात बीए २.७५ व्हेरिएंटचा शिरकाव

तब्बल आठवड्याभरानंतर राज्यात बीए २.७५ व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात पहिल्यांदाच सांगली, अमरावती आणि जालन्यात आता बीए २.७५ व्हेरिएंटची बाधा झालेले रुग्ण सापडले आहेत. रविवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बीए व्हेरिएंटच्या विविध प्रकारांचे एकूण ४८ रुग्ण सापडले आहेत.

पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार, राज्यातील विविध भागांत बीए ४ व्हेरिएंटचे २, बीए ५ व्हेरिएंटचे २८ आणि बीए २.७५ व्हेरिएंटचे १८ रुग्ण सापडले आहेत. सर्वात जास्त बीए व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या पुण्यात आढळून आली आहे. पुण्यात बीए व्हेरिएंटचे २१ रुग्ण सापडले, त्याखालोखाल ठाण्यात १३ रुग्णांना बीए व्हेरिएंटची बाधा झाल्याचे तपासणीअंती आढळून आले. रायगड जिल्ह्यात बीए व्हेरिएंटचे ४ तर कोल्हापूरातही दोन रुग्ण सापडले. मात्र सांगली जिल्ह्यात बीए २.७५ व्हेरिएंटचा शिरकाव होताच ६ जणांना या व्हेरिएंटची बाधा झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तर अमरावती आणि जालन्यात बीए व्हेरिएंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.

जिल्हानिहाय बीए व्हेरिएंट ४ आणि ५

  • पुणे – १०१, मुंबई-५१, ठाणे- १६, रायगड-७, सांगली – ५, नागपूर व पालघर – प्रत्येकी ४, कोल्हापूर २

राज्यात बीए व्हेरिएंट २.७५ची संख्या ८८ वर

जिल्हानिहाय रुग्णांची संख्या –

  • पुणे – ५६, नागपूर – १४, मुंबई – ५, अकोला – ४, ठाणे – ३, अमरावती, बुलडाणा, जालना, सांगली आणि यवतमाळ – प्रत्येकी १
  • रविवारी राज्यात नव्याने आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या – २ हजार १५
  • गेल्या २४ तासांत डिस्चार्ज रुग्णांची संख्या – १ हजार ९१६
  • रविवारी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या – ६

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here