राज्यात बीए रुग्णांच्या संख्या पुन्हा वाढत असल्याचे दिसून आले आहे. १० ते १९ ऑगस्टपर्यंत राज्यात बीए ४ आणि ५ चे ७३ आणि बीए २.७५ चे २०९ नवे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार बीए २.७५ या उपप्रकाराचे रुग्ण आढळले आहेत. तर बीए २.३८ चे रुग्ण आता कमी होत आहेत.
( हेही वाचा : ‘एकदम ओक्केमधी’… शहाजी बापूंचा डायलॉग बनतोय विधिमंडळात वाक्प्रचार)
राज्यात आता बीए ४ आणि ५ रुग्णांची संख्या ३४८ तर बीए २.८५ रुग्णांची संख्या ४५९ वर पोहोचली आहे. त्यापैकी राज्यभरात बीए ४ आणि ५ मध्ये पुणे २३५, मुंबई ७२, ठाणे १६, रायगड आणि नागपूरात प्रत्येकी ७, सांगलीत ६, पालघरमध्ये ४, कोल्हापूरात एक रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. बीए २.७५ मध्ये पुण्यात २३४, मुंबई १३१, नागपूरात ४४, यवतमाळमध्ये १९, चंद्रपूर १७, सोलापूरात ९, अकोल्यात आणि वाशिम प्रत्येकी २ तर सांगलीत आतापर्यंत एक रुग्ण सापडला आहे.
राज्यात ५ रुग्णांचा मृत्यू
राज्यात शुक्रवारी २ हजार २८५ नवे कोरोना रुग्ण आढळले, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. गेल्या २४ तासांत २ हजार २३७ रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९८.०२ टक्के आहे. शुक्रवारी मुंबईत दोन, सातारा, कोल्हापूरात आणि हिंगोलीतही प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
Join Our WhatsApp Community