पालघर आणि रायगडमध्येही बीए व्हेरीएंटचा शिरकाव

80

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पालघर आणि रायगड जिल्ह्यात बीए व्हेरीएंटचे रुग्ण आढळले. पालघर मध्ये 4 आणि रायगडमध्ये 3 बीए व्हेरीएंटचे रुग्ण आढळले आहेत. ठाण्यातही 2 नवे रुग्ण सापडल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. राज्यात आतापर्यंत बीए व्हेरिएंट आढळून आलेल्या रुग्णांची संख्या 63 पर्यंत पोहोचली आहे.

( हेही वाचा : एसटीच्या ताफ्यात दाखल होणार ४ हजार नव्या बस)

सोमवारच्या नव्या रुग्णांच्या नोंदीत बीए 5 व्हेरीएंटचे 7 तर बीए व्हेरीएंटचे 2 नवे रुग्ण आढळले. त्यात 6 पुरुष आणि 3 स्त्रियांचा समावेश होता. दोन रुग्ण अठरा वर्षांखालील दोन रुग्ण 19 ते 25 वयोगटातील होते. तर 26 ते 50 वयोगटातील 5 रुग्णांना बीए व्हेरिएंटची बाधा झाली. 31 मे ते 11 जून दरम्यान बीए व्हेरीएंटबाधित नऊ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. नऊ रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. नऊ रुग्ण घरगुती उपचारात बरे झाले.

डिस्चार्ज रुग्णांची संख्या वाढली

सोमवारी राज्यात पहिल्यांदाच नव्या रुग्णांपेक्षा कोरोना उपचारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. राज्याच्या विविध भागातून 3 हजार 482 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 3 हजार 566 कोरोना रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. मुंबईत 2, वसई-विरारमध्ये 2 तर रायगड जिल्ह्यात उपचारादरम्यान एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात आता 25 हजार 481 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.