पुण्यात बीए व्हेरीएंटचे नवे 46 रुग्ण

पुण्यातील बीजे मेडिकल महाविद्यालयाने दिलेल्या अहवालानुसार पुण्यात बीएव्हेरीएंटच्या रुग्णसंख्येत 46 नव्या रुग्णांची भर पडली आहे. पुण्यात बीए व्हेरिएंट2.75 चे 32 तर बीए व्हेरिएंट 5 चे 14 रुग्ण सापडले आहेत. यासह सोलापूरात बीए व्हेरीएंट 2.75 चा एक रुग्ण आढळला तर अकोल्यातही दोन रुग्णांना बीए व्हेरीएंट 2.75 ची बाधा झाली.

( हेही वाचा : ४० महिलांना लग्नाचे आमिष दाखवून केली आर्थिक फसवणूक; अखेर पोलिसांकडून अटक)

शनिवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बीए व्हेरीएंट 5 चे 14 तर बीए व्हेरीएंट 2.75 चे 35 रुग्ण सापडले. गेल्या महिन्यात 20 ते 28 जुलै महिन्यात हे रुग्ण सापडले. यामुळे राज्यात आतापर्यंत सापडलेल्या बीए 4 आणि बीए 5 व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या 272 आणि बीए 2.75 रुग्णांची संख्या 234 झाली आहे.

नव्या आणि डिस्चार्ज रुग्णांच्या संख्येत फारसा फरक नाही

शनिवारी राज्यात 1 हजार 931 नव्या रुग्णांचे निदान झाले. गेल्या 24 तासात 1 हजार 953 रुग्ण घरी बरे होऊन गेले.

9 कोरोनाबधितांचा मृत्यू

मुंबईत 2, नवी मुंबईत एक, अहमदनगर ग्रामीणमध्ये 3, अहमदनगर शहरांत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. पुण्यात आणि गडचिरोलीतही प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here