Hindu Village : मध्य प्रदेशात बनणार देशातील पहिले ‘हिंदू गाव’; बागेश्वर धाम म्हणाले, हा हिंदू राष्ट्राचा पाया

83
Hindu Village : मध्य प्रदेशात बनणार देशातील पहिले 'हिंदू गाव'; बागेश्वर धाम म्हणाले, हा हिंदू राष्ट्राचा पाया
Hindu Village : मध्य प्रदेशात बनणार देशातील पहिले 'हिंदू गाव'; बागेश्वर धाम म्हणाले, हा हिंदू राष्ट्राचा पाया

पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) म्हणजेच बाबा बागेश्वर (Baba Bageshwar) यांनी मध्य प्रदेशातील छतरपूर (Chhatarpur) येथे एका ‘हिंदू गावा’ची (Hindu Village) पायाभरणी केली आहे. बाबा बागेश्वर यांच्या गावात १००० हिंदू (Hindu) कुटुंब रहिवासी होणार आहेत. हे गाव त्यांच्या पवित्र स्था गढा गावाजवळ वसवले जात आहे. यासाठी बागेश्वर धामशी संबंधित संस्थेकडून जमीनही उपलब्ध करून दिली जात आहे. (Hindu Village )

( हेही वाचा : Muzaffarnagar मधील मुस्लिम कुटुंबातील १० जणांची हिंदू धर्मांत घरवापसी

या गावात दि. ३ मार्च रोजी काम करण्यात आले आहे. येथे २ कुटुंबांना आधीच घरे बांधण्यास सहमती दर्शविली आहे. ५० कुटुंबांनी आधीच त्यात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बाबा बागेश्वर यांनी म्हटले आहे की, हिंदू गावापासून (Hindu Village) हिंदू तहसील, हिंदू जिल्हा आणि हिंदू (Hindu) राज्य निर्माण होईल. बाबा बागेश्वर यांनी म्हटले आहे की, गढ्यात गाव नाही तर हिंदू राष्ट्राचा पाया रचला गेला आहे. हे गाव पुढील २ वर्षात तयार होईल. येथे राहणाऱ्या लोकांना संस्कृत शाळा, गौशाळा आणि यज्ञशाळा यासारख्या सुविधा मिळतील. (Hindu Village)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.