थूक जिहादनंतर आता शरबत जिहाद; Baba Ramdev यांनी उल्लेख करताच कट्टरपंथी भडकले

136
थूक जिहादनंतर आता शरबत जिहाद; Baba Ramdev यांनी उल्लेख करताच कट्टरपंथी भडकले
थूक जिहादनंतर आता शरबत जिहाद; Baba Ramdev यांनी उल्लेख करताच कट्टरपंथी भडकले

अलिकडेच योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ ते पतंजली उत्पादनाचा प्रचार करत आहेत. त्यात बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी ‘शरबत जिहाद’चा (Sharbat Jihad) उल्लेख केला आहे. या व्हिडिओमुळे धर्मांध मुस्लिम कट्टरपंथी संपत्प झाले आहेत. बाबा रामदेव म्हणाले की, शरबत जिहादच्या (Sharbat Jihad) मिळकतीचा पैसा कंपनी मशिदी आणि मदरसे बांधण्यासाठी वापरते.

( हेही वाचा : Mumbai मध्ये पायाभूत सुविधा, परिवहन व्यवस्था, वीज, पाणी सर्वत्र वाढला ताण; जनहित याचिकेतून उपस्थित झाले सवाल

दि. ४ एप्रिल २०२५ रोजी पतंजली उत्पादनाच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहले की, शरबत जिहाद (Sharbat Jihad) आणि कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या टॉयलेट क्लीनर्सच्या विषापासून तुमच्या कुटुंबाला आणि निष्पाप मुलांना वाचवा. घरी फक्त पतंजली शरबत आणि ज्यूस आणा.” असे त्या जाहिरातीत म्हटले होते. या व्हिडिओमध्ये बाबा रामदेव इतर ज्यूस कंपन्यांवर टीका करताना म्हणतात की, उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी लोक सॉफ्ट ड्रिंक्सच्या नावाखाली टॉयलेट क्लीनर पित राहतात. (Baba Ramdev)

ते पुढे म्हणतात, “एक कंपनी आहे जी शरबत विकते आणि कंपनीला मिळणाऱ्या पैशातून ते मदरसे आणि मशिदी बांधतात. जर तुम्ही ते शरबत प्याल तर मशिदी आणि मदरसे बांधले जातील आणि पतंजली शरबत पिऊन गुरुकुल, आचार्यकुलम, पतंजली विद्यापीठ आणि भारतीय शिक्षण मंडळ प्रगती करेल.”, असेही बाबा रामदेव (Baba Ramdev) म्हणाले. त्याला ‘शरबत जिहाद’ म्हणत त्यांनी त्याची तुलना ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) आणि ‘व्होट जिहाद’ (Vote Jihad) शी केली. बाबा रामदेव म्हणाले की, लव्ह जिहाद, वोट जिहाद प्रमाणे आता ‘शरबत जिहाद’ (Sharbat Jihad) टाळण्याची गरज आहे. (Baba Ramdev)

इस्लामी कट्टरपंथीयांना विरोध

फेसबुकवर हा व्हिडिओ ३७ दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला. इतके उघडपणे बोलल्याबद्दल अनेक लोक त्यांचे कौतुक करत आहेत, परंतु त्यांच्या विधानानंतर इस्लामिक कट्टरपंथी संतापले आहेत. इस्लामी प्रचारक मोहम्मद झुबैर यांनी बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, “शरबत जिहाद? (Sharbat Jihad) रामदेव आता हिंदू-मुस्लिम कार्ड खेळून कमी दर्जाचे पतंजली शरबत विकत आहेत. त्यांना माहित आहे की भारतीयांना मूर्ख बनवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. त्याच रामदेवांनी त्यांची पतंजली उत्पादने मध्य पूर्वेत विकली, त्यांच्या काही उत्पादनांना हलाल प्रमाणपत्र मिळवले, कारण त्यांना पतंजली उत्पादने आखाती देशांमध्ये निर्यात करायचे होते.”, असा आरोपही त्यांनी बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यावर केला.

शरबत जिहादच्या आधी थुंक जिहाद आणि लघुशंका जिहाद

मुळात बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या विधानाने संतापलेले इस्लामी कट्टरपंथी त्यांनी ‘शरबत जिहाद’ (Sharbat Jihad) हा शब्द का वापरला असा प्रश्न विचारत आहेत. सप्टेंबर २०२४ मध्ये, शामली जिल्ह्यातून थुंक जिहादच्या घटना समोर आल्या होत्या. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ज्यूस विक्रेता आसिफ ज्यूसमध्ये थुंकताना दिसत होता. त्याचवेळी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. हिंदू (Hindu) संघटनांनीही आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लावण्याची मागणी केली होती. याआधीही उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक दुकानदार लोकांना रसात लघुशंका मिसळून प्यायला लावत असे. या प्रकरणात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी ज्यूस विक्रेत्याला आणि त्याच्या १५ वर्षांच्या मुलाला अटक केली. पोलिसांनी त्याच्या दुकानातून लघुशंकेने भरलेला एक कंटेनरही जप्त केला. (Baba Ramdev)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.