Baba Ramdev: पतंजलीच्या १४ औषधांवर बंदी, उत्तराखंड सरकारच्या औषध नियंत्रण विभागाची कारवाई

१४ औषधांचे उत्पादन थांबवण्याचे आदेश उत्तराखंड सरकारने दिले आहेत. इतकंच नाही, तर या औषधांचा परवानादेखील सरकारने रद्द केला आहे.

244
Baba Ramdev: पतंजलीच्या १४ औषधांवर बंदी, उत्तराखंड सरकारच्या औषध नियंत्रण विभागाची कारवाई

दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजलीला आणखी एक मोठा झटका बसला आहे. पतंजली आयुर्वेदिक फार्मा कंपनीच्या तब्बल १४ औषध विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड सरकारच्या औषध नियंत्रण विभागाने ही कारवाई केली आहे. (Baba Ramdev)

उत्तराखंड सरकारने सोमवारी (२९ एप्रिल) सायंकाळी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. त्यात असं म्हटलंय की, “पतंजली आयुर्वेदाच्या उत्पादनांबाबत वारंवार दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्यामुळे आम्ही कंपनीच्या १४ औषधांवर बंदी घातली आहे.”

(हेही वाचा – ICG- NCB- Gujarat ATS: भारतीय मासेमारी नौकेतून १७३ किलो चरस जप्त, २ खलाशी ताब्यात )

बंदी घातलेल्या औषधांची नावे…
बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये श्वासारि गोल्ड, श्वासारि वटी, दिव्य ब्रोंकोम, श्वासारि प्रवाही, श्वासारि अवलेह, मुक्ता वटी एक्स्ट्रा पावर, लिपिडोम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पावर, लिवामृत एडव्हान्स, लिवोग्रिट, आईग्रिट गोल्ड आणि पतंजली दृष्टी आय ड्रॉप या औषधांचा समावेश आहे.

उत्पादनही रद्द
या १४ औषधांचे उत्पादन थांबवण्याचे आदेश उत्तराखंड सरकारने दिले आहेत. इतकंच नाही, तर या औषधांचा परवानादेखील सरकारने रद्द केला आहे. तसा आदेशही सर्व जिल्हा औषध निरीक्षकांना पाठवण्यात आला आहे. याशिवाय केंद्रीय आयुष मंत्रालयालाही ही माहिती देण्यात आली आहे.

पतंजलीला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
नुकतंच सुप्रीम कोर्टानेदेखील पंतजलीचे मालक बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना फटकारलं होतं. पतंजलीकडून दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिराती केल्या जात असल्याचं सांगत कोर्टानं नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी तातडीने माफी मागा, असे आदेशही कोर्टाने दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर पतंजलीने २ वेळा वृत्तपत्रांमध्ये माफीनाम्याची जाहीरात दिली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.