Baby Crocodile In Swimming Pool : दादरच्या महात्मा गांधी जलतरण तलावात सापडले मगरीचे पिल्लू

130
Baby Crocodile In Swimming Pool : दादरच्या महात्मा गांधी जलतरण तलावात सापडले मगरीचे पिल्लू

मुंबईच्या दादर येथील महात्मा गांधी जलतरण तलाव परिसरातील (Baby Crocodile In Swimming Pool) ऑलिंपिक आकारच्या जलतरण तलावात आज, मंगळवारी पहाटे ५:३० च्या सुमारास मगरीचे पिल्लू आढळून आले आहे. हे पिल्लू तज्ज्ञांच्या मदतीने पकडण्यात आले असून ते खात्याच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच हे मगरीचे पिल्लू तरण तलावात कुठून आले, याची चौकशी करण्यात येईल व त्यानुसार आवश्यक ती प्रतिबंधात्मक काळजी भविष्यात घेण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना जलतरण तलाव व नाट्यगृहांचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी सांगितले की, रोज पहाटे तरण तलाव (Baby Crocodile In Swimming Pool) सदस्यांसाठी सुरू करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांद्वारे तरण तलावाचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात येते. यानुसार आज पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास तरण तलावाचे निरीक्षण करीत असताना ऑलम्पिक आकाराच्या व शर्यतीसाठीच्या तरण-तलावात (Olympic size Racing Swimming Pool) मगरीचे पिल्लू आढळून आले. त्यानंतर तज्ञांच्या मदतीने तात्काळ कार्यवाही करीत हे पिल्लू सुरक्षितपणे पकडण्यात आले आहे. हे पिल्लू वनखात्याच्या ताब्यात देण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे, अशी ही माहिती देण्यात आली आहे.

अधिक माहितीनुसार, महात्मा गांधी जलतरण तलावाच्या शेजारी असलेल्या (Baby Crocodile In Swimming Pool) दादरच्या मरीन एक्वा प्राणीसंग्रहालयात सध्या छापा सुरू आहे. वनविभाग आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे घटनास्थळी उपस्थित आहेत. या प्राणीसंग्रहालयातून मगरीचे बाळ जलतरण तलावात पोहोचल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

(हेही वाचा – Google Chromebook : गूगल भारतात क्रोमबुक बनवणार, आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडून कौतुक )

काही दिवसांपूर्वी दादरमधील महात्मा गांधी स्मारक आंतरराष्ट्रीय जलतरण तलावामधील (Baby Crocodile In Swimming Pool) पंप हाऊसच्या परिसरात एक धामण जातीचा साप आढळून आला. येथील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीस हा साप पडल्याने सर्प मित्राला बोलावून त्याला पकडण्यात आले. तब्बल पाच फुट लांबीचा हा साप होता. हा साप धामण जातीचा असल्याचे सर्प मित्रांचे म्हणणे आहे. अशाच प्रकारे मागील जून महिन्यात अजगर जातीचा साप दिसून आला होता. या अजगराला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो सर्प मित्राला पुढे सापडलाच नाही. त्यामुळे या परिसरात अजगराचा वावर आजही असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील चार ते पाच महिन्यांमध्ये (Baby Crocodile In Swimming Pool) सर्प दर्शनाचे आणि सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोहायला येणाऱ्या सदस्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे यासर्व भागाची पुन्हा एकदा साफसफाई करून याठिकाणी सरपटणारा कोणताही प्राणी नाही याची खातरजमा करावी. कारण येथे येणाऱ्या प्रत्येक सदस्यांची सुरक्षा ही महत्वाची असून भलेही आजवर सापडलेले साप हे बिनविषारी असले तरी सापाला घाबरुन ह्दयविकाराच्या रुग्णांना धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता महापालिका प्रशासनाने तातडीने या प्राणिसंग्रहालयाला नोटीस बजावून त्यांना मान्यता आहे किंवा नाही हे तपासून त्यांच्यावर पुढील कारवाई करावी अशी मागणी धुरी यांनी केली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.