Cycle Track : मुलुंडच्या सायकल ट्रॅकची दुरवस्था

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी शेजारी झोपड्या हटवून प्रत्येकी दहा मीटरचा परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला.

162
Cycle Track : मुलुंडच्या सायकल ट्रॅकची दुरावस्था
Cycle Track : मुलुंडच्या सायकल ट्रॅकची दुरावस्था
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी शेजारी झोपड्या हटवून प्रत्येकी दहा मीटरचा परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला. त्यामुळे जलवाहिनीच्या बाजुच्या बांधकामे हटवल्यानंतर त्याठिकाणी पुन्हा कोणतेही अतिक्रमण होऊ नये म्हणून महापालिकेच्यावतीने या जलवाहिनीच्या बाजुला सायकल ट्रॅकसह पदपथ आणि सेवा रस्त्यांसह उद्यान विकसीत करण्यात आले. मुलुंड भागातील जलवाहिनीच्या जवळची बांधकामे हटवून अशाचप्रकारे मोकळ्या केलेल्या जागेवर महापालिकेने प्रायोगिक तत्वावर सायकल ट्रॅक उभारले होते. सात ते आठ वर्षांपूवी बनवलेल्या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पाच्या सायकल ट्रॅकच्या रस्त्यावरच खड्डे पडून या भागाची दुरावस्था झाल्याचे पहायला मिळत आहे. (Cycle Track)

न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने जलवाहिनी लगतच्या झोपड्या तथा बांधकामे हटवून जलवाहिनी अतिक्रमण मुक्त केल्या. त्यामुळे या मुख्य जलवाहिनीच्या परिसरात महापालिकेच्यावतीने हरितवारी जलतीरी या प्रकल्पांतर्गत सायकल ट्रॅक, पदपथ, सेवा रस्ता, उद्याने आदी विकसीत करयात आले. त्यानुसार मुलुंड येथील मुख्य जलवाहिनीलगत १.१४० किमी लांबीचा पट्टा हा प्रायोगिक तत्वावर विकसीत करण्याचा निर्णय घेऊन या प्रकल्पाचे काम सन २०१६-१७मध्ये पूर्ण केले. परंतु सात ते आठ वर्षांपूर्वी बनवलेल्या या सायकल ट्रॅकचे बांधकाम डांबरी केल्याने यावर रस्त्यावर विविध ठिकाणी खड्डे पडलेले आहे. तर काही ठिकाणी असमान पृष्ठभाग झाला आहे. त्यामुळे या पायलट प्रकल्पातील रस्त्याचे पुनर्पृष्ठिकरण व दुरुस्ती करणे आवश्यकता भासू लागली आहे. या रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिकांना होणाऱ्या या गैरसोयीमुळे या सायकल ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. या कामांसाठी आता विविध करांसह चार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. शंखेश्वर एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. (Cycle Track)

(हेही वाचा – Sharad Pawar vs Ajit Pawar : शरद पवार गटावर निवडणूक आयोग नाराज; पुढील सुनावणी २४ नोव्हेंबरला)

मुंबईतील अंतर्गत वाहतुकीला एक नवा पर्याय देणाऱ्या ३९ किमी लांबीच्या सायकल ट्रॅकच्या चार पैकी पहिल्या दोन टप्प्याच्या कामाला सन २०१८मध्ये सुरुवात झाली होती. त्यामुळे मुंबईकरांना सायकलने मुलुंडहून धारावीला किंवा घाटकोपरहून शीव परिसरात जाऊ शकतील असा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. मुलुंडचा सायकल ट्रॅकचा बनवण्यात आला असला तरी या सायकल ट्रॅकचा वापर अधिक प्रमाणात होत नसून ज्या हेतून याचे बांधकाम करण्यात आले आहे,त्याचा वापर होत नसल्याने या सायकल ट्रॅकवर केलेला सर्व खर्च वाया गेल्याचे आरोपही होत आहे. त्यामुळेच काही सायकल ट्रॅकचे प्रकल्प महापालिकेने गुंडाळले आहेत. (Cycle Track)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.