दादर महात्मा गांधी जलतरण तलावांमधील महिलांच्या चेंजिंग रुमचीच दुरावस्था

252
दादर महात्मा गांधी जलतरण तलावांमधील महिलांच्या चेंजिंग रुमचीच दुरावस्था
दादर महात्मा गांधी जलतरण तलावांमधील महिलांच्या चेंजिंग रुमचीच दुरावस्था

दादर येथील महात्मा गांधी स्मारक आंतरराष्ट्रीय जलतरण तलावांमध्ये पोहायला येणाऱ्या महिलांच्या कपडे बदलण्याच्या खोलीमधील (चेंजिंग रुम) फॉल सिलिंगचा भाग काही दिवसांपूर्वी कोसळला. सुदैवाने त्यात कोणत्याही महिलेला दुखापत झाली नसली तरी प्रत्यक्षात या सिलिंगच्या तुटलेल्या भागाची डागडुजीही युध्दपातळीवर हाती न घेतल्याने येथील महिला सभासदांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दादरमधील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक जलतरण तलावांमध्ये पोहायला येणाऱ्या सभासद सदस्यांची संख्या एक हजारांच्या आसपास असून मागील वर्षी या तरण तलावांमध्ये ऑनलाईनद्वारे सभासद नोंदणी करण्यात आली आहे. त्यानुसार महिला व पुरुष हे याठिकाणी पोहायला येत असतात. याठिकाणी पोहोयला येणाऱ्या महिला सभासदांसाठी असलेल्या कपडे बदलण्याच्या खोलीची दुरावस्थाच झालेली आहे.

काही दिवसांपूर्वी या चेंजिंग रुममधील पंख्याच्या वरच्या बाजुचा फॉल सिलिंगचा भागच कोसळून पडला. त्यामुळे येथील छताचा भाग धोकादायक बनला असून त्यातच आतील पंख्याची विद्युत जोडणी नादुरुस्त झाल्याने त्याची दुरुस्ती करण्याकडे महापालिका प्रशासनासह तरण तलावाच्या व्यवस्थापनाचा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महिला सभासदांकडून केला जात आहे.

(हेही वाचा – ४० वर्षे जुन्या फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास परवानगी द्या: फेरीवाला संघटनेचे महापालिकेला निवेदन)

महिला सभासदांच्या म्हणण्यानुसार, या खोलीत कपडे बदलायला जातानाही घाबरत जावे लागते तसेच तिथे पंख्याचीही सुविधा नाही. त्यामुळे ही बाब येथील व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य होत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. या खोलीच्या बदल्यात पर्यायी व्यवस्थाही कोणत्याही प्रकारची उपलब्ध करून न दिल्यामुळेही ही नाराजी आता अधिक वाढत आहे.

काही वर्षांपूर्वी पुरुषांसाठी कपडे बदलण्यासाठी खोली असतानाही ते उघड्यावर कपडे बदलत असल्याने महिला वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. परंतु आजही काही व्यक्ती अशाप्रकारे नियमांचा भंग करत उघड्यावरच कपडे बदलत असतात. त्यामुळे अशाप्रकारे उघड्यावर कपडे बदलणाऱ्या सभासदांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी महिला वर्गांकडून केली जात आहे. तरण तलावाचा कारभार हा अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या हाती असून एक महिला म्हणून त्यांनी महिलांच्या कपडे बदलण्याच्या खोलीतील सुविधांसह इतर सुविधांकडे जातीने लक्ष द्यावे, अशीही मागणी महिला वर्गाने केली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.