Elon Musk : एलॉन मस्क यांच्या भारतात टेस्ला आणण्याच्या प्रयत्नांना धक्का

आयात केलेल्या ई-कारवर अनुदान किंवा शुल्क सवलती देण्याचा विचार नसल्याचं केंद्र सरकारने केलं स्पष्ट. 

277
Elon Musk : एलॉन मस्क यांच्या भारतात टेस्ला आणण्याच्या प्रयत्नांना धक्का
Elon Musk : एलॉन मस्क यांच्या भारतात टेस्ला आणण्याच्या प्रयत्नांना धक्का
  • ऋजुता लुकतुके

आयात केलेल्या ई-कारवर अनुदान किंवा शुल्क सवलती देण्याचा विचार नसल्याचं केंद्र सरकारने (Central Govt) केलं स्पष्ट. (Elon Musk)

जगभरात प्रसिद्ध असलेली ई-कार टेस्लाचा भारतातील प्रवेश इतक्यात शक्य होणार नाही. कंपनीचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, त्यांनी केंद्र सरकारला (Central Govt) विनंती करून इलेक्ट्रिक कारच्या आयातीवर शुल्क सवलत किंवा अनुदान देण्याची विनंती केली होती. पण, वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी राज्यसभेत लेखी उत्तर देताना केंद्र सरकारचा (Central Govt) असा कुठलाही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. (Elon Musk)

फक्त टेस्लाच नाही तर सर्वच इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपन्यांना हा निर्णय लागू होणार आहे. पण, अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अमेरिकन दौऱ्यात एलॉन मस्क (Elon Musk) यांची भेट घेतली. तेव्हापासून मस्क आणि भारत सरकारची याविषयी बोलणी सुरू असल्याचं म्हटलं जात होतं. अगदी ब्लूमबर्ग सारख्या वृत्तपत्रांनीही या आशयाची बातमी दिली होती. (Elon Musk)

(हेही वाचा – Naina Project Panvel : शेतकरी विरोधी नैना प्रकल्प रद्द झालाच पाहिजे; अंबादास दानवेंनी केली मागणी)

इलेक्ट्रिक कारचं (Electric car) उत्पादन भारतात सुरू व्हावं यासाठी प्रलोभन म्हणून सुरुवातीला या कंपन्यांना आपल्या कार भारतात निर्यात करण्यासाठी भारत सरकार सवलत देऊ करेल अशा प्रकारची बातमी चर्चिली जात होती. त्यावरूनच राज्यसभेत सरकारची यावर काय भूमिका आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता. (Elon Musk)

पण, आता सोम प्रकाश यांच्या उत्तराने सध्या तरी अशा चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. (Elon Musk)

यावर्षी जून महिन्यात पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि एलॉन मस्क यांची अमेरिकेत न्यूयॉर्क इथं भेट झाली होती. त्यानंतर मस्क यांनी मीडियाशी बोलताना आणि सोशल मीडियावर वेळोवेळी, ‘टेस्लाच्या कार भारतात दिसू शकतील. हे अगदीच शक्य आहे,’ असं वक्तव्य केलं होतं. (Elon Musk)

(हेही वाचा – Conversion of Tribals : आदिवासींच्या धर्मांतरणाला चाप लागणार; मंत्री मंगलप्रभात लोढांची ग्वाही)

पण, टाईम्स समुहाने तेव्हा दिलेल्या बातमीनुसार, मस्क यांना भारतात टेस्ला कारचं उत्पादन सुरू करायचं होतं. पण, त्यापूर्वी भारताने टेस्ला कारची आयात सुरू करावी आणि त्यावर १५ टक्के सवलतीत आयात शुल्क आकारावं अशी अट मस्क यांनी घातली होती. (Elon Musk)

पण, आता सोम प्रकाश यांच्या ताज्या माहितीनंतर मस्क (Elon Musk) आणि इतर परदेशी कार उत्पादकांनाही सवलतींसाठी वाट बघावी लागणार असंच दिसतंय. (Elon Musk)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.