सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे आढळता कामा नये. त्यामुळे, आढळेल तो खड्डा तात्काळ बुजवावा. मुंबईत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात दिरंगाई आणि गुणवत्तेशी तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. सध्या सुरू असलेली रस्त्यांच्या डागडुजींची अर्थात खड्डे बुजवण्याची कामे ही ७ जून २०२४ पूर्वी पूर्ण करावीत आणि हे रस्ते पूर्णपणे वाहतूकयोग्य करावेत. अन्यथा कंत्राटदारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे रस्त्यावरील खड्डे मास्टिक अस्फाल्टद्वारे बुजवले जात असले तरी जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्ता (JVLR) जंक्शन येथे प्रायोगिक तत्त्वावर ‘जिओ पॉलिमर’ आणि घाटकोपर येथील गोदरेज कंपनीसमोर ‘मायक्रो सरफेसिंग’ या पद्धतींचा अवलंब करण्यात आला आहे. (Bad Patches Road)
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या सूचनेनुसार, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी ३१ मे २०२४ रोजी पूर्व द्रुतगती महामार्गावरील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन रस्ते दुरूस्ती कामांची पाहणी केली. चेंबूर पूर्व येथील के. बी. गायकवाड नगर, कुर्ला येथील राहुल नगर, घाटकोपर येथील छेडा नगर, घाटकोपर येथील पंत नगर जंक्शन, जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्ता (JVLR) जंक्शन आणि घाटकोपर पूर्वस्थित नालंदानगर या ठिकाणांना भेट दिली. दुरूस्ती कामांची स्थिती पाहून त्यांनी संबंधितांना आवश्यक ते दिशानिर्देश दिले. या पाहणी दौऱ्यात प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) मनीष पटेल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Bad Patches Road)
पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ते वाहतूकयोग्य असावेत. त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा योग्य ठिकाणी पुनर्पृष्ठीकरण करावे. पुनर्पृष्ठीकरण करताना सखल भागात पावसाचे पाणी साचणार नाही, याची खबरदारी बाळगावी. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. रस्त्यांच्या डागडुजीची कामे ७ जून २०२४ पूर्वी पूर्ण करणे अनिवार्य, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. रस्ते विभागातील अभियंत्यांनी परिमंडळाचे उप आयुक्त, विभागांचे सहायक आयुक्त यांच्याशी समन्वय साधून रस्ते दुरूस्तीचा प्राधान्यक्रम निश्चित करावा. वाहतुकीस अडथळा न येता दिवस-रात्र कामे पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी हे रस्ते पूर्णपणे वाहतूकयोग्य करावेत, असे देखील निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले. (Bad Patches Road)
(हेही वाचा – Pandharpur Vitthal Mandir : पंढरपुरातील मंदिरात सापडलं तळघर)
गगराणींनी दिले हे निर्देश
मुंबई महानगरात ठिकठिकाणी रस्ते बांधणी व डागडुजी आदी कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी रस्ते कामांच्या प्रगतीचा, डागडुजीचा काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष पाहणीतून आढावा घेतला होता. पावसाळा सुरु होण्यापूर्वी रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करावीत, रस्ते वाहतूकयोग्य करावेत, पावसाळ्यात कोणत्याही रस्त्याचे काम सुरु ठेऊन नागरिकांची गैरसोय करु नये, असे निर्देश गगराणी यांनी दिले होते. पाहणी दौऱ्यादरम्यान बांगर म्हणाले की, पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुख्य रस्ते आणि सेवा रस्ते वाहतूकयोग्य असावेत, यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यात खड्डे बुजविण्याबरोबरच सुधारणा योग्य भागांच्या (Bad Patches) पुनर्पृष्ठीकरणाचा समावेश आहे. जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्ता (JVLR) जंक्शन येथे प्रायोगिक तत्त्वावर ‘जिओ पॉलिमर’ आणि घाटकोपर येथील गोदरेज कंपनीसमोर ‘मायक्रो सरफेसिंग’ या पद्धतींचा अवलंब करण्यात आला आहे. रस्ते अभियंत्यांनी या दोन्ही पद्धतीचे फायदे स्पष्ट केले आहेत. सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. (Bad Patches Road)
पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे आढळता कामा नये. त्यामुळे, आढळेल तो खड्डा तात्काळ बुजवावा, तसेच रस्त्यांच्या कडेला असलेला राडारोडा तात्काळ उचलून घ्यावा. पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्त्यांच्या डागडुजीची कामे वाहतुकीस अडथळा न येता अहोरात्र वेगाने करून ७ जून २०२४ पूर्वी पूर्ण झालीच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. अभियंत्यांनी रस्ते कामाशी संबंधित विविध विभागांसमवेत विशेषत: परिमंडळांचे उप आयुक्त, सहायक आयुक्त यांच्याशी योग्य समन्वय ठेवावा. वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने कामे होण्याकडे लक्ष द्यावे. रस्त्याची एक कडा ते दुसऱ्या बाजूची कडा या दरम्यानच्या रस्त्याचे पुनर्पृष्ठीकरण करावे. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये, यादृष्टीने खबरदारी बाळगावी, अशा सूचनाही अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी यावेळी दिल्या. (Bad Patches Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community