Badlapur सरकारी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय दोन दिवस अंधारात

242
बदलापूर (Badlapur) येथील सरकारी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात शनिवार आणि रविवार सलग दोन दिवसांपासून वीज नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे येथील रुग्णालयातील रुग्णांची अवस्था बिकट झाली आहे. जिल्हा स्तरावरील रुग्णालयाची अशी दुरवस्था झाल्याने जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत रुग्णालय प्रशासनाने जनरेटरने वीज पुरवण्याचा प्रयत्न केला, मात्र आता जनरेटरही आता बंद पडले आहे, अशा शब्दांत रुग्णालय प्रशासन हतबलता मांडत आहे. रुग्णालय प्रशासन वारंवार महावितरण कार्यालयाला संपर्क करत आहेत, मात्र कार्यालय त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे रुग्णालय प्रशासन सांगत आहे. ज्या बदलापूरला (Badlapur) शहराला सरकार मेट्रो सिटी बनवण्याची घोषणा करत आहे, त्या बदलापुरातील सरकारी रुग्णालयात रुग्णाच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे.
सलग दोन दिवस रुग्णालयातील वीज गेल्यामुळे येथील प्रसूतिगृहदेखील अंधारात आहेत. या वॉर्डात प्रसूती झालेल्या महिला आहेत आणि त्यांचे नवजात बालके आहेत, त्या सर्वाची गैरसोय होत आहे. बदलापूरमध्ये  (Badlapur) मध्यमवर्गीय राहतात. त्यांच्यासाठी हेच सरकारी रुग्णालय मोठा आधार आहे. अशा वेळी या रुग्णालयाकडे दुर्लक्ष होत आहे. यावर उपाय म्हणून रुग्णांचे नातेवाईक आता घरून बॅटरीचे लाईट रुग्णालयात आणून आपल्या रुग्णापुरता प्रकाश या अंधारात करत आहेत, अशी दुर्दैवी स्थिती या रुग्णालयाची आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.