बदलापूर अत्याचार घटनेवर विरोधी महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आणि न्यायालयाच्या दट्ट्यानंतर ‘बंद’ मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. महाविकास आघाडीला महिलांच्या सुरक्षेच्या मुद्दयाचे राजकारण करण्यात रस होता हे स्पष्ट आहे आणि तसे असेल तर त्यांनी गांधींप्रमाणे ब्रिटिश कायद्याविरोधात ‘सविनय कायदेभंग’ (Civil Disobedience) केला तसा बदलापूर प्रकरणी ‘सविनय कायदेभंग’ का नाही केला? असा सवाल माजी आमदार, प्रा. अशोक मोडक (Ashok Modak) यांनी उपस्थित केला. (Badlapur issue)
माजी आमदार
प्रा. मोडक हे अभ्यासक, लेखक, प्राध्यापक असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत, अनेक रिसर्च पेपर्स लिहिले आहेत. मोडक हे राज्याच्या विधान परिषदेवर दोन वेळा १९९४ आणि २००० मध्ये निवडून गेले आहेत. काही काळ त्यांनी माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. (Badlapur issue)
(हेही वाचा – Dahihandi 2024 : विक्रोळीत जय जवान पथकाचे ९ थर; एकावर एक ४ एक्के)
आंदोलनात ‘मविआ’चे कार्यकर्ते
“बदलापूरची घटना दुर्दैवी आहेच. पण त्याचे महाविकास आघाडीने राजकारण केले. रेल्वेट्रॅकवर त्यांनीच कार्यकर्ते पाठवून आंदोलन केले. त्यानंतर २४ ऑगस्टला घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद ची हाक दिली. मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवत राज्य शासनाला याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या,” असे सांगून मोडक म्हणाले, “तेव्हा शरद पवार यांच्यासह काँग्रेस आणि शिवसेना उबाठाने बंद मागे घेतला. विरोधी पक्षांना महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे असे खरंच वाटत होते तर त्यांनी कायदेशीर कारवाईला न घाबरता गांधींप्रमाणे ‘सविनय कायदेभंग’ करायला हवा होता, तो का नाही केला?” असा प्रश्नही प्रा. मोदक यांनी विचारला. (Badlapur issue)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community