Badlapur MIDC Fire : बदलापूर येथील कंपनी मध्ये भीषण स्फोट ; चार ते पाच कामगार गंभीर जखमी

बदलापूर खरवई एमआयडीसी मध्ये व्ही.के केमिकल्स या कंपनीमध्ये पहाटे चार वाजून ४५ मिनिटाच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.

451
Badlapur MIDC Fire : बदलापूर येथील कंपनी मध्ये भीषण स्फोट ; चार ते पाच कामगार गंभीर जखमी

बदलापूर खरवई एमआयडीसी (Badlpaur MIDC)  मध्ये गुरुवारी ( १८ जानेवारी) पहाटे मोठी दुर्घटना घडली आहे. व्ही.के केमिकल्स या कंपनीमध्ये पहाटे चार वाजून ४५ मिनिटाच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीदरम्यान कंपनीमध्ये चार ते पाच मोठे स्फोट झाल्याचेही समोर आलं. या ठिकाणी झालेल्या स्फोटाचे हादरे चार ते पाच किलोमीटरपर्यंत जाणवले. या स्फोटात चार ते पाच कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. Badlapur MIDC Fire

(हेही वाचा : Suraj Chavan : आदित्य ठाकरेंचा निकटवर्ती सूरज चव्हाणला ED कडून अटक)

 
कंपनीतील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीच्या बाहेर दोन टेम्पो उभे होते. यावेळी या टेम्पो मधील केमिकलमुळे प्रथम आग लागली. त्यांनतर ही आग कंपनीमध्ये पसरली. या आगीबाबत माहिती मिळताच बदलापूर, अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसी मधील अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून अर्ध्या तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळण्यास अग्निशमन दलाला यश आलं आहे. Badlapur MIDC Fire

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.