बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) हा पोलीस चकमकीत ठार झाला, या प्रकरणी अक्षयच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सोमवार, ७ एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली, तेव्हा न्यायालयाने या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.
(हेही वाचा Saudi Arabia ची भारत, पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी; Muslim नागरिकांची इस्लामी राष्ट्राकडूनच गोची )
या चकमकीमध्ये जे पोलीस अधिकारी उपस्थित होते, त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले होते. अक्षय शिंदेच्या (Akshay Shinde) एन्काऊंटरवेळी जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशावर वकील असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली. असीम सरोदे म्हणाले, अक्षय शिंदे (Akshay Shinde) एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस हे सॉफ्ट टारगेट आहेत. पोलिसांवर कोणी दबाव आणला, त्यांच्यावर दबाव आणून कोणी एन्काऊंटर करायला लावला? याची माहिती घ्यावी लागेल, असे वकील सरोदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community