बदलापूर येथील एका शाळेत शिपायाने ४ वर्षीय २ शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार (Badlapur School Case) केले. या प्रकरणी आरोपीला आमच्यासमोर फाशी द्या, अशी मागणी करत आंदोलकांनी थेट बदलापूर रेल्वे स्थानकात जमून रेल्वे ट्रॅकवर उतरले. त्यामुळे मध्य रेल्वे बदलापूर रेल्वे स्थानकाकडे रेल्वे ठप्प झाली. त्यानंतर तब्बल सहा तास पोलीस आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यामुळे अखेर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करून त्यांना पांगवले.
रेल्वेस्थानकातील परिस्थितीत नियंत्रणात आहे. रेल्वे रुळांवर असलेल्या आंदोलकांना आम्ही हटवले आहे. काही लोक ऐकत नसल्याने त्यांच्यावर सौम्य स्वरुपाचा लाठीचार्ज केल्याचे पोलिसांनी सांगितले. ते म्हणाले की, पाच ते दहा मिनिटांमध्ये आम्ही रेल्वे ट्रॅक रिकामा केला आहे. त्यामुळे याची माहिती आम्ही रेल्वे प्रशासनाला दिलेली आहे. त्यानंतर लोकल ट्रेन या मार्गावरील सुरळीत होईल, असेही ते म्हणाले. (Badlapur School Case)
(हेही वाचा Badlapur प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? राज ठाकरेंचा संतप्त सवाल)
तत्पूर्वी सरकारचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी बदलापूर रेल्वेस्थानकात जाऊन रेल्वे रोको आंदोलन थांबवावे, अशी विनंती आंदोलकांना केली होती. परंतु लोकांनी त्यांचे काहीही ऐकले नाही. जवळपास पाऊन तास मनधरणी करून देखील हाती काहीच आले नाही. त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांत पोलिसांकडून आंदोलकांना विनंती करण्यात आली. तरी देखील आंदोलक ऐकायला तयार नव्हते जेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला तेव्हा आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली.
Join Our WhatsApp Community