बदलापूर येथील एका नामांकित शाळत २ चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली असता, शाळेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यानेच हा प्रकार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या घटनेचे बदलापूरात तीव्र पडसाद उमटल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Minister Deepak Kesarkar) यांनी तातडीने चौकशीचे आदेश उपसंचालकाला दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
संबंधित अहवाल आमच्याकडे आला असून आमच्या विभागाच्या संचालकांनी या शाळेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. शिक्षण विभागाने जी कारवाई करायची होती ती पूर्ण झालेली आहे. गुरुवार पासून या शाळेचा ताबा प्रशासक घेतील (administrators will take over the school) अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिली.
(हेही वाचा – Sanjay Shirsat यांची टीका; म्हणाले सुप्रिया सुळे या…)
मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर (Deepak Kesarkar press conference) म्हणाले की, महाराष्ट्रात असे प्रकार घडू नये यासाठी आजच वेगवेगळ्या उपाययोजना करण्याबाबत आढावा घेतला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्ती करताना खबरदारी, तक्रार पेटी, सखी सावित्री समितीच्या तरतुदीचं पालन, विद्यार्थी सुरक्षा समितीची स्थापना करणे. अशी प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, समिती सदस्य यांच्यावरही कारवाई केली जाईल असे विधान शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Minister Deepak Kesarkar) यांनी केले.
हेही पाहा –