बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाबाबत चुकीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीवर अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले. (Badlapur School Case) रितिका प्रकाश शेलार (Ritika Prakash Shelar) असे या तरुणीचे नाव आहे. अंबरनाथ येथे राहणाऱ्या या तरुणीचे इन्स्टाग्रामवर ५ लाख ५० हजार फॉलोअर्स आहेत. रितीकाने तिच्या इन्स्टाग्रामवर बदलापूर लैगिंक अत्याचार प्रकरणाबाबत अफवा पसरवली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रितिका शेलार या तरुणीने बदलापूर आंदोलनानंतर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल केला होता. या मेसेजमध्ये पीडितांपैकी एकाचा मृत्यू झाला होता आणि एका आईने आत्महत्या केली असल्याचे म्हटले होते.
पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेत ठाणे सायबर पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. “तांत्रिक तपास केल्यानंतर रितिका हिने सोशल मीडियावर अफवा पसरवल्याचे निष्पन्न झाले. तो मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होऊन समाजात चुकीचा संदेश पसरला. रितिकाला अंबरनाथ येथून ताब्यात घेण्यात आले असून तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे,” एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
जनतेने अफवा पसरवू नये किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Badlapur School Case)
हेही पहा –