महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर विणीच्या हंगामात अंडी घालण्यासाठी येणाऱ्या ऑलिव्ह रीडले कासावाच्या समुद्रातील हालचालीबाबत मोठी माहिती हाती आली आहे. यंदाच्या वर्षांत गुहा आणि बागेश्री या दोन मादी ऑलिव्ह रीडले कासवांना सॅटेलाईट टॅग केले होते. गेल्या पाच महिन्यांच्या त्यांच्या अरबी समुद्रातील वावर आता दिवसेंदिवस शास्त्रज्ञासाठी आणि प्राणीप्रेमीसाठी उत्कंठा वाढवू लागला आहे. महिनाभर श्रीलंकाजवळील समुद्रात राहिल्यानंतर बागेश्रीने थेट बंगालच्या उपसागराकडे कूच केली आहे. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर अंडी घालणारी ऑलिव्ह रीडले कासव दोन्ही किनाऱ्यावर फिरतात का, याबद्दलला महत्वाचा शोध आता हाती लागणार आहे.
ओडिशा किनारपट्टीवर विणीच्या हंगामात ऑलिव्ह रीडले लाखोंच्या घरात एकत्र समुद्रकिनारा गाठत अंडी देतात. अंडी दिल्यानंतर ऑलिव्ह रीडलेच्या समुद्रभ्रमंतीबाबत भारतीय वन्यजीव संस्थेने रेडिओ कॉलरिंगच्या मदतीने संशोधन केले. कासवांच्या पाठीवर सॅटेलाईट रेडिओकॉलरिंग लावून त्यांच्या समुद्रभ्रमंतीचा मार्ग शोधला. त्यानंतर 2022 पासून महाराष्ट्रातील किनाऱ्यावर विणीच्या हंगामात येणाऱ्या ऑलिव्ह रीडले कासवांच्या समुद्रातील भ्रमंतीमार्ग जाणून घेण्याचे भारतीय वन्यजीव संस्था आणि वनविभागाच्या कांदळवनकक्षाने ठरवले.
(हेही वाचा राज्यसभेत ‘I.N.D.I.A’ आघाडीत फूट; मणिपूरवर चर्चेसाठी टीएमसी तयार)
पहिल्यांदा प्रकल्प अयशस्वी ठरल्यानंतर यंदाच्या वर्षांत गुहा आणि बागेश्री या दोन मादी ऑलिव्ह रीडले कासवांना फेब्रुवारी महिन्यात सॅटेलाईट टॅगिंग केले गेले. त्यापैकी बागेश्रीने सुरुवातीपासून दक्षिण अरबी समुद्राकडे प्रयाण केले. कर्नाटक, केरळ आणि श्रीलंकेच्या खोल समुद्रात ती फिरत होती. यंदाच्या आठवड्यात बागेश्रीने आता बंगालच्या उपसागराकडे जायला सुरुवात केली. तर गुहा आता कर्नाटक आणि केरळच्या खोल समुद्रात फिरत आहे .
Join Our WhatsApp Community