बजरंग दलाने (Bajrang Dal) ‘कुमती निवार सुमती के संगी’ ग्रुपच्या माध्यमातून देशभरात हनुमंत शक्तीबद्दल जागृती करण्याचे आवाहन केले. दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि इतर संघटना तसेच हिंदुविरोधी देशद्रोही मानसिकतेबद्दल व्यापक जनजागृती केली जाईल, अशी घोषणा विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी केली.
(हेही पहा – PM Narendra Modi : काँग्रेस कुकर्मांमुळे देश मागास राहिला; पंतप्रधान मोंदींचा हल्लाबोल)
बजरंग बलीच्या (Bajrang Dal) भक्तांच्या अपमानाचा निषेध करण्यासाठी ९ मे रोजी होणाऱ्या राष्ट्रव्यापी हनुमंत शक्ती जागरणमध्ये संपूर्ण हिंदू समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहनही केले आहे. आपल्या कुटुंबातील सदस्य, शेजारी आणि मित्रांसह देशभरात हजारो ठिकाणी आयोजित या हनुमान चालीसा कार्यक्रमांपैकी एक किंवा दुसऱ्या कार्यक्रमात सहभागी होऊन धर्मविरोधी शक्तींना पराभूत करण्यात आपला सहभाग सुनिश्चित करा. बजरंग दल (Bajrang Dal) देशभरात गोरक्षण, कन्या संरक्षण, रक्तदान, मठ मंदिर आणि धर्माचे रक्षण तसेच धर्मांतर थांबवणे, अशा अनेक प्रकारच्या सेवा कार्यात गुंतलेला आहे, हे या सर्व नेत्यांना दिसत नाही का, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
हेही वाचा –
आज कर्नाटक काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा आणि त्यानंतर राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काँग्रेससह इतर काही हिंदुद्वेषी नेत्यांची घोषणा केली आहे. बजरंग दलावर (Bajrang Dal) बंदी घालणे आणि या देशभक्त संघटनेची पीएफआयसारख्या देशद्रोही, दहशतवादी, हिंसक संघटनेशी तुलना करणे अत्यंत अपमानास्पद आहे. अशा अपमानाला हिंदू समाज नक्कीच लोकशाहीचा धडा शिकवेल, असे मिलिंद परांडे म्हणाले.
Join Our WhatsApp Community