सध्या संपूर्ण देशभरात महागाईने उच्चांक गाठला आहे. लिंबांच्या दरांनी सुद्धा प्रतिकिलो १०० ते १५० रुपये इतकी विक्रमी पातळी गाठली आहे. आता बेकरी पदार्थांच्या किमतींमध्ये सुद्धा वाढ होणार आहे.
बेकरी पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या तेल, डालडा, मैदा यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे केक, पेस्ट्री, टोस्ट, खारी आदींच्या दरात ३० टक्के वाढ झाली. सोलापूर प्रोग्रेसिव्ह बेकरी ओनर्स असोसिएशनच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय झाल्याची माहिती अध्यक्ष धनंजय हिरेमठ यांनी दिली.
( हेही वाचा : हापूस होणार स्वस्त! )
बेकरी पदार्थ महागले
तेलाच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कोविडपूर्व १३५ रुपये किलो असणारे तेल आता १८५ रुपये किलो झाले आहेत. अलिकडच्या काळात मैद्याच्या दरातही सातत्याने वाढ झाली. बेकरी उत्पादने बनवण्यासाठी तेल, मैदा हा प्रमुख कच्चा माल आहे. यांच्या दरात वाढ झाल्याने बेकरी उत्पादनांच्या दरात वाढ करणे हाच पर्याय आहे. त्याचा विचार करून उत्पादकांनी एकत्र येऊन चर्चा केली. अशी माहिती बेकरी पदार्थ उत्पादकांनी दिली आहे.
( हेही वाचा : या उन्हाळ्यात लिंबू पाणी विसरा! )
केकही महागणार
केक बनवण्यासाठी प्रामुख्याने मैदा, फ्रेश क्रिम, चॉकलेट आदी पदार्थांचा वापर केला जातो. परंतु मैदाचे भाव तसेच केकसाठी लागणारे सजावट साहित्य सुद्धा महागल्यामुळे परिणामी केकच्या दरात ३० टक्के वाढ झाली आहे. अशी माहिती हिरेमठ यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community