बालाकोट एअर स्ट्राईकला ४ वर्ष पूर्ण! भारताने असे उद्धवस्त केले होते पाकिस्तानातील दहशतवादी तळ

130

१९७१ नंतर भारताने पाकिस्तानवर पहिल्यांदाच एअर स्ट्राईक केला. बालाकोट हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचे तळ भारताने उद्धवस्त केले आणि पुलावामा हल्ल्याचा बदल घेतला. या घटनेला ४ वर्ष पूर्ण आहेत. जम्मू काश्मीर येथील पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान हुतात्मा झाले त्यामुळेच भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हा एअर स्ट्राईक केला.

( हेही वाचा : प्रवाशांची ‘समृद्धी’! महामार्गावर उभारणार भव्य फूडकोर्ट, मिळतील ‘या’ सुविधा )

पाकिस्तानातील दहशतवादी तळ केले उद्धवस्त

२६ फेब्रुवारी २०१९ मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानात प्रवेश केला. भारतीय हवाई दलाने यावेळी बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. भारतीय हवाई दलाच्या मिराज २०० आणि सुखोई एसयू ३० या विमानांनी हा एअर स्ट्राईक केला होता. या हल्ल्यामध्ये जवळपास २५० दहशतवादी ठार झाले होते. पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट एअर स्ट्राईक करून भारताने आपली ताकद, सामर्थ्य दाखवत पाकिस्तानला चोख उत्तर दिले.

पुलावामा हल्ल्यानंतर भारताने केले एअर स्ट्राईक

पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर येखील पुलवामा येथे भारतीय लष्करावर हल्ला केला. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू काश्मीर महामार्गावरून सीआरपीएफ जवानांचा ताफा जात होता. यावेळी स्फोटकांनी भरलेल्या एका कारने या ट्रकला धडक दिली. या हल्ल्यामध्ये ४० जवान हुतात्मा झाले. या घटनेनंतर जगभरातून पाकिस्तानवर टीका करण्यात आली. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर देणे आवश्यक होते. यामुळे भारताने बालाकोट एअर स्ट्राईक केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.