मुंबईतील ४० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे समुदाय चिकित्सालय

79

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये प्रत्येकी २० याप्रमाणे हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समुदाय चिकित्सालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याप्रमाणे दोन्ही उपनगरांमध्ये प्रत्येकी २० चिकित्सालय बांधण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. पोर्टेबल केबीनमध्ये बनवण्यात येणाऱ्या चिकित्सालयाकरता कोणत्याही प्रकारची जागा निश्चित न करता ठोकप्रमाणे कंत्राटदाराची नेमणूक करत त्यासाठी एकूण साडे अठरा कोटींचा खर्च केला जाणार आहे.

कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली

मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने चालवण्यात येणारे दवाखाने आणि आरोग्य केंद्रांच्या सुविधांमध्ये दर्जोन्नती करतानाच अधिकाधिक दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टयांमधील जनतेला प्राथमिक आरोग्य सुविधा मिळावी यासाठी पोर्टा केबिन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर आदी तिन्ही ठिकाणी प्रत्येकी २० याप्रमाणे या पोर्टा केबिन उभारुन त्याद्वारे आरोग्य सुविधा पुरवली जाणार आहे. या नवीन संकल्पनेला तत्कालिन महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समुदाय चिकित्सालय अशाप्रकारे नाव दिले आहे. सध्या पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये प्रत्येकी २० पोर्टेबल कॅबिन उभारण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या चिकित्सालयात सर्व प्रकारचे उपचार केले जाणार असून विविध प्रकारच्या चाचण्याही केल्या जाणार आहे. त्यामुळे रुग्णांवरील प्राथमिक उपचारांसह विविध प्रकारच्या आजारांवरही उपचार केले जाणार असल्याने रुग्णांना मोठ्या रुग्णालयात धाव घ्यावी लागणार नाही. यासाठी पश्चिम उपनगरांसाठी आर्मस्ट्राँग कंस्ट्रक्शन या कंपनीची निवड करण्यात आली असून या कंपनीला शिवाजी पार्कमधील केळुसकर मार्गला जोडणाऱ्या श्री स्वामी समर्थ व्यायामशाळा मार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम केले असून निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या कंपनीला रस्त्यांवरील चर बुजवण्याची कामे यापूर्वी सोपवण्यात आली आहे. रस्ते आणि चर बुजवण्याची कामे करणाऱ्या या कंपनीला आता पश्चिम उपनगरांमध्ये २० पोर्टा कॅबिनमध्ये उभारण्यात येणाऱ्या चिकित्सालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

(हेही वाचा अजित डोभाल यांच्या मुंबई दौऱ्यामागील काय आहे कारण?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.