Balasaheb Thackeray Jayanti : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन

61
Balasaheb Thackeray Jayanti : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन
Balasaheb Thackeray Jayanti : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन

शिवसेनाप्रमुख (Shivsena) बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी या दिवशी जयंती असते. २३ जानेवारी १९२६ रोजी जन्मलेले बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आजही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. गेल्या अनेक दशकांपासून बाळासाहेब ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावशाली आहेत. जयंतीच्या निमित्ताने अनेक नेते त्यांना अभिवादन करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही एक्स पोस्टद्वारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Jayanti) यांना आदरांजली वाहिली आहे.

(हेही वाचा – Waqf Amendment Bill 2024 : सर्व धर्मांच्या धार्मिक मालमत्तांच्या बंदोबस्तासाठी एकच कायदा करा; विंहिपची मागणी)

बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या जयंतीनिमित्त मी आदरांजली वाहतो. समाज कल्याण आणि महाराष्ट्राच्या विकासाप्रती असलेल्या बाळासाहेबांच्या वचनबद्धतेबद्दल त्यांचा सर्वत्र आदर केला जातो आणि त्यांचे स्मरण केले जाते. बाळासाहेबांनी आपल्या मूळ विचारांबद्दल कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान वाढवण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे, असे पंतप्रधानांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

शिवसेनेच्या वतीने या निमित्ताने मुंबईत मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. (Balasaheb Thackeray Jayanti)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.