Balasaheb Thackeray National Memorial : बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची जागा २१५ चौरस मीटरने वाढली

612
Balasaheb Thackeray National Memorial : बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची जागा २१५ चौरस मीटरने वाढली
  • सचिन धानजी,मुंबई 

शिवाजी पार्कमधील महापौर निवासाची जागा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी देण्याचा निर्णय फेब्रुवारी २०१७मध्ये घेण्यात आल्यानंतर तब्बल ११ हजार ५५१ चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा आणि त्यानंतर ३६२ चौरस मीटरची जागा बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारक न्यासाला देण्यात आली होती. परंतु आता या जागेच्या प्रत्यक्ष क्षेत्रफळात सुमारे २१५ चौरस मीटरची अधिक जागा महापालिकेच्या मोजणीतून ताब्यात आल्याने आता बाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेचे एकूण क्षेत्रफळ हे १२, १२८. ४१ चौरस मीटर एवढे झाल्याची माहिती मिळत आहे. (Balasaheb Thackeray National Memorial)

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाला छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील महापौर निवासाची जागा देण्याचा प्रस्ताव ११ जानेवारी २०१७ मध्ये सुधार समितीत मंजूर करण्यात आला. परंतु ऐनवेळी आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा प्रस्ताव सभागृहात अडकून पडला होता. परंतु निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्याच महापालिका सभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. (Balasaheb Thackeray National Memorial)

(हेही वाचा – ‘हाता’ च्या आधाराशिवाय Shiv Sena UBT ला जिंकता येणार नाही विधानसभा निवडणूक)

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ३० वर्षांकरता आणि वार्षिक एक रुपया या नाममात्र दराने ही जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापौर निवास हे सीआरझेड-टूमध्ये मोडत असून यासाठी ११ हजार ५५१ चौरस मीटर एवढी जागा देण्याचा ठराव महापालिका सभागृहाने मंजूर केला होता. महापौर निवास स्थानाच्या जागेवरील त्यानंतर ३६२ चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा ऑगस्ट २०१९च्या ठरावानुसार देण्यात आली. त्यानुसार स्मारकाला देण्यात आलेल्या जागेचे एकूण क्षेत्रफळ ११,९१३ चौरस मीटर एवढे झाले होते. मात्र मोजणीप्रमाणे या जागेचे एकूण क्षेत्रफळ हे १२,१२८.४१ चौरस मीटर येत आहे. त्यानुसार अधिकचे ताब्यात असलेले क्षेत्र २१५.३६ चौरस मीटर येत असून ही अधिकची जागा भूकर क्रमांक ५०२ (पैकी) या मिळकतीचे असल्याचे दिसून येत असल्याचे भूमापन व भूमि अभिलेख (शहर) अधीक्षक यांच्या पत्रामध्ये नमुद केले. या मोजणीचा नकाशा ३० मे २०२४ रोजी सादर केला असल्याची माहिती मिळत आहे. (Balasaheb Thackeray National Memorial)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.