बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. हा महामार्ग हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, हा रस्ता तयार करणा-या बुलढाणा जिल्ह्यातील रोडवेज सोल्युशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने गेल्या पाच महिन्यांपासून वेतन न दिल्याचा आरोप करत मध्यप्रदेशातील 300 हून अधिक कामगारांनी आंदोलन सुरु केले आहे.
बुलढाण्यातील पॅकेज सातचे काम या कंपनीने केले असून, तंढेगाव कॅम्पमधील तीनशेच्यावर मजुरांना त्यांची मजुरी तब्बल पाच महिन्यांपासून मिळालेली नाही, असा आरोप या मजुरांनी केला आहे. हे सर्व मजूर मध्यप्रदेशातील असून, या मजुरांवर व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आता मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून, कंपनी विरोधात आक्रमक झाले आहेत.
( हेही वाचा: धर्मवीर की स्वराज्यरक्षक? अजित पवारांच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया )
नेमकं प्रकरण काय?
रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंपनीमार्फत हजारो मजूर समृद्धी मार्गावर काम करत होते. दिवसरात्र काम करुन सुद्धा त्यांना घाम गाळलेल्या कामचा मोबदला दिला जात नाही. त्यामुळे तीनशे मजुरांनी किनगावराजा 15 किमी पायी जाऊन सोमवारी सायंकाळी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र राहेरी नदी पुलावर हा मुजरांचा मोर्चा पोलिसांनी अडवला आणि कंपनीच्या जबाबदार व्यक्तीशी चर्चा करण्यात आली. पुढील आठवड्यात या मजुराच्या खात्यात त्यांचे वेतन दिले जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. मात्र, कारागारांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत आमचे वेतन मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी भूमिका मजूरांनी घेतली आहे.
Join Our WhatsApp Community