Balasaheb Thackeray Smriti Sthal : बाळासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला स्मृती स्थळावर शिवसेनेची अशी आदरांजली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच ९७वी जयंती मंगळवारी २३ जानेवारी २०२४ रोजी पार पडत असून या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील बाळासाहेबांचे स्मृती स्थळ फुलांनी सजवण्यात आले. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी आदल्या दिवशी शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकारी अभिवादन केल्यानंतर झालेल्या वादावादीनंतर आता जयंतीदिनाकडे सर्वांचे लक्ष आहे.

553
Balasaheb Thackeray National Memorial : बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची जागा २१५ चौरस मीटरने वाढली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची ९७वी जयंती मंगळवारी २३ जानेवारी २०२४ रोजी पार पडत असून या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील बाळासाहेबांचे स्मृती स्थळ फुलांनी सजवण्यात आले. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी आदल्या दिवशी शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकारी अभिवादन केल्यानंतर झालेल्या वादावादीनंतर आता जयंतीदिनाकडे सर्वांचे लक्ष आहे. परंतु जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे सोमवारी श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून काढण्यात येणाऱ्या रॅलीची सुरुवातच स्मृती स्थळावर बाळासाहेबांना अभिवादन करून केली जाणार आहे. त्यामुळे यंदा अयोध्येतीतील मंदिरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्याने बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाल्याने या स्मृतीस्थळाला वंदन करताना जयंती निमित्त बाळासाहेबांना आदरांजली वाहण्याचाही योग जुळवून आणला. (Balasaheb Thackeray Smriti Sthal)

New Project 2024 01 22T171408.438

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या ९७व्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील स्मृती स्थळावर महापालिकेच्यावतीने उद्यान विभागाच्यावतीने फुलांनी सजवण्यात आले आहे. स्मृतीस्थळावर विविध जातीच्या व विविध रंगाच्या फुलांच्या रोपांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. अयोध्येत राम मंदिराचे निर्माण झाल्याने या प्रभू राम चंद्राच्या मूर्ती प्रतिष्ठापन सोहळ्या निमित्त बाळासाहेबांच्या स्मृती स्थळ आकर्षक फुलांनी सजवण्यात आले. शिवसैनिकांचे शक्तीस्थळ असलेल्या या स्मृती स्थळावर अभिवादन करण्यासाठी येत्या मंगळवारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा होणार आहे. (Balasaheb Thackeray Smriti Sthal)

New Project 2024 01 22T171521.479

(हेही वाचा – Shri Ramlala Pratishthapana : राजधानी झाली राममय, जय श्री राम च्या गजराने दिल्ली भक्तिमय)

बाळासाहेबांची जयंती आणि राम मंदिराचे निर्माण असा दुग्धशर्करा योग

मात्र, या स्मृती स्थळावर आदल्यादिवशी येऊन अभिवादन करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मुख्यनेता असलेल्या शिवसेनेचे पदाधिकारी करत असतात. शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये बाचाबाची आणि ताणतणाव वाढू नये म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी आदल्यादिवशी या स्मृती स्थळावर भेट देतात. परंतु यंदा बाळासाहेबांची जयंती आणि राम मंदिराचे निर्माण असा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. बाळासाहेबांचे राम मंदिराचे स्वप्न तथा इच्छा साकार झाल्याने शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस वंदन करून वडाळा राम मंदिरापर्यंतच्या रॅलीला सुरुवात करतानाच जयंती निमित्तही अभिवादन करण्याची संधीचा योग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जुळवून आणला. त्यामुळे या रॅलीचे आयोजनाच्या माध्यमातूनच शिवसेनेने मंदिराचे श्रेय शिवसेनाप्रमुखांना देत एकप्रकारे आपले शक्तीप्रदर्शनही छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरासह शिवसेना भवन, दादर, परेल भागांमध्ये केले. (Balasaheb Thackeray Smriti Sthal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.