ओडिशात झालेल्या भीषण तिहेरी रेल्वे अपघातात 290 हून अधिक प्रवाशांना जीव गमवावा लागल्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने शुक्रवारी तीन रेल्वे अधिकाऱ्यांना अटक केली. यात वरिष्ठ विभाग अभियंता अरुण कुमार महंता, विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार अशी या तिघांची नावे आहेत. भारतीय दंड संहिता कलम 304 आणि 201 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
सीबीआयने महिनाभर चाललेल्या तपासानंतर आता या प्रकरणात दोषी हत्या आणि पुरावे नष्ट करण्याशी संबंधित दोन कठोर कलमे जोडली आहेत. एजन्सीने गेल्या महिन्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये या कलमांचा वापर केला नव्हता, ओडिशा पोलिसांनी या प्रकरणाची पुनर्नोंदणी केली होती. रेल्वे सुरक्षा आयुक्त (CRS) यांनी बालासोर दुर्घटनेचा अहवाल बुधवारी रेल्वे बोर्डाला सादर केल्यानंतर ही अटक करण्यात आली. दरम्यान, उच्चस्तरीय चौकशीत अलीकडेच ‘चुकीचे सिग्नलिंग’ हे रेल्वे अपघाताचे मुख्य कारण असल्याचे आढळून आले आणि सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन (S&T) विभागामध्ये एकाहून अधिक पातळ्यांवर त्रुटी असल्याचे दिसून आले.
(हेही वाचा Aurangzeb : राष्ट्रवादीतून बीआरएसमध्ये आलेल्या नेत्याचे ‘औरंग्या प्रेम’)
Join Our WhatsApp Community