जहाज आणि पूल यांच्या धडकेचे कारण अद्याप अस्पष्ट
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ७ लोकं बेपत्ता असून २ जणांना वाचवण्यात यश आले आहे तसेच जहाजातील २२ भारतीयांपैकी कोणीही जखमी झाले नाही त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. दाली जहाजाची मालकी असलेल्या कंपनीने सांगितले की, जहाजावर उपस्थित असलेल्या २ वैमानिकांसह संपूर्ण क्रू सुरक्षित आहे. त्यांना दुखापत झालेली नाही. जहाज आणि पूल यांच्या धडकेचे कारण अद्याप समोर आलेले नाही. जहाजाचे मालक आणि अधिकारी चौकशी करत आहेत.
सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार,
बाल्टिमोर हार्बरमध्ये पाण्याचे तापमान ९ अंश सेल्सियस आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, जेव्हा २१ अंश सेल्सियसच्या खाली असते तेव्हा शरीराचे तापमानही वेगाने खाली येते. त्यामुळे पाण्यात बुडालेल्या लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. गेल्या वर्षी बाल्टिमोर बंदरातून सुमारे ५२ दशलक्ष टन आंतरराष्ट्रीय मालवाहतूक झाली. त्याची किंमत ६.६७ लाख कोटी रुपये होती. या बंदरातून १५ हजारांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला. यामुळे मेरिलँडमध्ये सुमारे १.३९ लाख लोकांची गुजराण होते.
Join Our WhatsApp Community#WATCH : अमेरिकेतील बाल्टिमोरमधील फ्रान्सिस स्कॉट ब्रिज मंगळवारी पहाटे कोसळला
अपघातातील जखमींची माहिती अद्यापही समोर आलेली नाही
.
.
.#hindusthanpostmarathi #marathinews #breaking #trending #Baltimore #bridgecollapse #USA pic.twitter.com/AI8ceEm4mI— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) March 26, 2024