बालवाडी शिक्षकांच्या मानधनात ३ हजारांनी वाढ, मदतनीसांना मिळणार २ हजारांची वाढ

146

मुंबई महापालिकेच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या बालवाड्यांमधील शिक्षकांच्या मानधनात आता भरघोस वाढ होणार असून मागील पाच वर्षांपासून कोणत्याही प्रकारे वाढ न झालेल्या या मानधनात तब्बल ३ हजारांनी वाढ होणार आहे. त्यामुळे बालवाडी शिक्षकांचे मानधन चालू शैक्षणिक वर्षांत ८ हजार रुपये एवढी होणार आहे. तर मदतनीसांच्या मानधनांमध्ये दोन हजारांनी वाढ होऊन पाच हजार रुपये एवढे होणार आहे.

( हेही वाचा : सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देणार – मुख्यमंत्री)

मुंबई महापालिका शाळांमधील मुलांच्या पटसंख्येत होणारी गळती लक्षात घेता पटसंख्येत वाढ करण्याच्यादृष्टीकोनातून बालवाडींची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. सन २००७-०८मध्ये बालवाडी वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात बालवाडी शिक्षकांच्या मानधनात वाढ करून प्रतिमहा दीड हजार रुपये व मदतनीसांना ७०० रुपये एवढे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सन २००९मध्ये महानगरपालिकेचे ११८०त्यात बालवाडी शिक्षिकांना व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करून अनुक्रमे २ हजार रुपये व १ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी या बालवाडी शिक्षकांच्या मानधनात वाढ केली गेली.

सन २०१८-१९ मध्ये बालवाडी वर्गाच्या मागणीनुसार विभागनिहाय नव्याने ३९६ बालवाडी वर्ग सुरु करण्यात आलेले आहेत. त्यानुसार सद्यस्थितीत एकूण ९०० बालवाडी वर्गाना महानगरपालिकेची मंजूरी मिळाली आहे. या ९०० बालवाडी वर्गापैकी सन २०२१-२२ मध्ये एकूण ८१५ बालवडी वर्ग सुरु होते. त्यामध्ये एकूण २७७२६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांमुळे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली करिता विद्यार्थी पट वाढण्यास मदत होत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शाळापूर्व शिक्षण (बालवाडी) यावर जास्तीत जास्त भर देवून बालवाडी अंगणवाडी यांचे सक्षमीकरण करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.

मात्र, मागील पाच वर्षांपासून कोणतीही वाढ न दिलेल्या बालवाडी शिक्षिकांना आता पाच हजारांऐवजी आठ हजार रुपये आणि मदतनीसांना ३ हजार रुपयांऐवजी ५ हजार रुपये एवढे मानधन देण्याचा निर्णय घेतला असून याला प्रशासकांची मान्यता मिळाली आहे.

दरम्यान, महापालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याचे प्रस्तावित आहे. याबाबताच प्रस्ताव प्रशासकांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर याचा लाभ बालवाडी शिक्षिकांना तसेच मदतनीसांना दिला जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना अशाप्रकारे करण्यात आली मानधनात वाढ

  • सन २००७-०८ : बालवाडी वर्गातील शिक्षिका प्रतिमहा १५००रुपये, मदतनीस ७००रुपये
    (प्रति बालवाडी असे एकूण २,४०० रुपये मासिक खर्च)
  • सन २००९-२०१० : ११८० बालवाडी : शिक्षिका प्रतिमहा मानधन : २ हजार रुपये,मदतनीस १ हजार रुपये
    ( प्रति बालवाडी असे एकूण रु.३.२०० रुपये मासिक खर्च)
  • सन २०१४-१५ : ७५२८ मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत चालणा-या बालवाडी वर्गाच्या शिक्षकांना प्रतिमहा ३ हजार रुपये व मदतनीसांना १५००रुपये
    (प्रति बालवाडी असे एकूण ४.७०० रुपये मासिक खर्च)
  • सन २०१७-१८ : ५०४ बालवाडी वर्गातील बालवाडी शिक्षिकांना ५००० रुपये, मदतनिसांना ३ हजार रुपये
    (प्रति बालवाडी असे एकूण ८.२०० रुपये मासिक खर्च)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.