Ban From Maharashtra Government : परराज्यात ऊस नेण्यास महाराष्ट्र सरकारकडून बंदी

शेतकऱ्यांवर दुष्काळासोबत दुहेरी संकट

182
Ban From Maharashtra Government : परराज्यात ऊस नेण्यास महाराष्ट्र सरकारकडून बंदी
Ban From Maharashtra Government : परराज्यात ऊस नेण्यास महाराष्ट्र सरकारकडून बंदी

राज्याच्या साखर पट्ट्यात यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित पाऊस पडला नसल्यामुळे उसाची वाढ खुंटली. त्यामुळे यावर्षी हंगामात होणारी ऊस टंचाई लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने अन्य राज्यांतील कारखान्यांना ऊस घालण्यास बंदी करणारी अधिसूचना बुधवारी लागू करण्यात आली आहे.

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला दीड महिना मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाला. उसाचे पीक पावसाने ओढ दिली तरी लगेच मरत नाही; मात्र त्याची वाढ खुंटते. यंदाच्या हंगामात तसेच घडले आहे. त्यामुळे येत्या हंगामात किमान १५ टक्के गाळप कमी होईल, असा अंदाज आहे. एप्रिल 2024 पर्यंत शेतकऱ्यांना शेजारच्या कर्नाटकातील कारखान्यांना ऊस परराज्यांत नेण्यास महाराष्ट्र सरकारकडून बंदी घालण्यात येणार आहे. सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी ही अधिसूचना काढली आहे.

(हेही वाचा – Gujarat Shiv Yatra : गुजरातमध्ये शिव यात्रेवर मुस्लिमांकडून दगडफेक; ३ पोलिसांसह ६ जण जखमी; १५ जणांना अटक)

कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे 10 लाख, सांगली, सोलापूरमधील काही ऊस आणि उत्तर महाराष्ट्रातून गुजरातच्या कारखान्यात ऊस जातो. या आदेशामुळे हा ऊस थांबवला जाण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील साखर आयुक्तांनी यंदाचा हंगाम सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कारखानेही 15 ऑक्टोबरपासूनच सुरू करण्याच्या हालचाली आहेत.

उसाची वाढ नाही…!
यावर्षी उसाची वाढ न होण्यामागे दोन महत्त्वाची कारणे आहेत. पाऊस चांगला झालेला नाही. दुसरे म्हणजे खताच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांनी पिकासाठी युरियाच वापरला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून उसाचे पीक कमी येणार आहे. पाऊस लांबला तर यापुढे हे पीक जगवायचे कसे? असा प्रश्न सोलापूरसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे आलेले पीक जनावरांच्या चाऱ्यासाठीही काढून विकले जाऊ शकते.

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.