Ban on Fishing : १ जून ते ३१ जुलैपर्यंत राज्यात मासेमारी बंद; कारण…

मासेमारी बंदी (Ban on Fishing) कालावधीत मासेमारी करताना यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही.

167
Ban on Fishing : १ जून ते ३१ जुलैपर्यंत राज्यात मासेमारी बंद; कारण...

राज्याच्या सागरी क्षेत्रात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी करण्यास बंदी (Ban on Fishing) घालण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने तसे आदेश जारी केले आहेत.

मासळीच्या साठ्याचे जतन, तसेच मच्छीमारांच्या (Ban on Fishing) जीवित व वित्त यांचे रक्षण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम १९८१ च्या कलम ४च्या पोटकलमाद्वारे प्राप्त अधिकारांचा वापर करून- १ जून ते ३१ जुलै राज्याच्या सागरी क्षेत्रात मच्छीमारी नौकांना बंदी करण्यात आली आहे. या कालावधीत मासळी प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते, मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठयाचे जतन होते.

(हेही वाचा – Murder : दिल्लीत थरारक हत्याकांड; धर्मांध मुसलमान युवकाने हिंदु मुलीवर ३६ वार करून केले ठार)

या कालावधीत खराब वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमाराची (Ban on Fishing) जीवित व वित्तहानी टाळता येणे शक्य होते. त्यामुळे या कालावधीत यांत्रिक मच्छीमारी नौकांना मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.

तर कारवाई होणार…

राज्याच्या सागरी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंत) यांत्रिक मासेमारी (Ban on Fishing) नौकेने पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) २०२१ च्या कलम १४ अन्वये नौका व नौकेवर बसवलेली उपसाधने व मासेमारी सामग्री आणि त्यात सापडलेली मासळी जप्त केली जाणार आहे.

हेही पहा – 

तसेच मासेमारी बंदी (Ban on Fishing) कालावधीत मासेमारी करताना यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.