रस्त्यावर किंवा उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ वर्तमानपत्रातून विकत असाल तर सर्व फेरीवाल्यांवर कारवाई करायला आता अन्न व औषध प्रशासन सज्ज झाले आहे. कोणत्याही अन्नपदार्थाला वर्तमानपत्रातून विकण्याला आता अन्न व औषध प्रशासनाने बंदी घातली आहे. या पद्धतीची विक्री राज्यभरात कुठेही आढळून आली तर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श.रा.केंकरे यांनी दिला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन
अन्न पदार्थ आणि वर्तमानपत्रातील छपाईसाठी वापरलेली शाई एकमेकांत मिसळल्यास आरोग्यास हानिकारक ठरत असल्याबाबत आतापर्यंत ब-याचदा डॉक्टरांकडून आवाहन करण्यात येत होते. परंतु भंगारातून कमीत-कमी किंमतील वर्तमानपत्रे विकल्यानंतर अन्नपदार्थ योग्य पद्धतीने बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राची कात्रणेच फेरीवाल्यांकडून, अन्नपदार्थ विकणा-या दुकानदारांकडून विकली जातात. मात्र ही पद्धत माणसांच्या शरिरात विविध आजारांना निमंत्रण देऊ शकते, या सवयींपासून परावृत्त होण्याचे आवाहनही अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
(हेही वाचाः आर्ट फेस्टिव्हलमुळे वनिता समाज कल्याण केंद्राचे ‘शुद्धीकरण’!)
सतत वर्तमानपत्रात बांधलेले अन्नपदार्थ खाणे धोकादायक
Join Our WhatsApp Communityवर्तमानपत्रातील शाईमध्ये मॅटल आणि कार्बनचा समावेश असतो. मात्र दोन्हींचे प्रमाण अत्यल्प असते. सतत वर्तमानपत्रात बांधलेले अन्नपदार्थ खाल्ले की डायरिया किंवा किडनीचे विकार होण्याची संभावना असते. लोकांनी वर्तमानपत्रात अन्नपदार्थ गुंडाळून देण्याऐवजी बटर पेपरचा वापर करावा.
-डॉ अविनाश सुपे, पोटविकारज्ज्ञ