Jharkhand सरकारच्या शिक्षणसंस्थेत सरस्वतीपूजेवर बंदी; विरोधानंतर आदेश मागे

52
Jharkhand सरकारच्या शिक्षणसंस्थेत सरस्वतीपूजेवर बंदी; विरोधानंतर आदेश मागे
Jharkhand सरकारच्या शिक्षणसंस्थेत सरस्वतीपूजेवर बंदी; विरोधानंतर आदेश मागे

रांची (Ranchi, Jharkhand) येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) या शिक्षणसंस्थेत सरस्वतीपूजा (saraswati puja) साजरी करण्यावर बंदी घालण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेला हा कार्यक्रम रहित करण्याचा आदेश देण्यात आला होता. आर्.आय.एम्.एस्.च्या प्रशासनाने विद्यार्थ्यांना ऐनवेळी पूजेची तयारी थांबवण्याची आणि देणगीचे पैसे परत करण्याचे आदेश दिले; परंतु याला कडाडून विरोध झाल्याने पूजा रहित करण्याचा आदेश मागे घेण्यात आला.

(हेही वाचा – भाजपा आमदार Ranjitsinh Mohite Patil यांच्यावर पक्षाकडून कारवाईची शक्यता)

येथे दरवर्षी विद्यार्थी एकत्रितपणे ‘आर्.आय.एम्.एस्.’मध्ये सरस्वतीपूजा आयोजित करतात. हा कार्यक्रम ‘एम्.बी.बी.एस्.’च्या दुसर्‍या वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून आयोजित केला जातो. या वर्षीच्या सरस्वती पूजा उत्सवासाठी विद्यार्थ्यांनी लाखो रुपयांच्या देणग्या गोळा करून सर्व व्यवस्था केली होती. सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले होते. आर्.आय.एम्.एस्.च्या डीन शशिबाला सिंह यांनी २५ जानेवारीला अचानक पूजा रहित करण्याचा आदेश जारी केला. आर.आय.एम्.एस्. प्रशासनाच्या या आदेशावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.

आर्.आय.एम्.एस्.चे न्यूरोसर्जन डॉ. विकास कुमार यांनीही या आदेशाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, आर्.आय.एम्.एस्.चे उच्चपदस्थ अधिकारी त्यांचा कमीपणा लपवण्यासाठी देशाच्या सांस्कृतिक परंपरांवर थेट हल्ला करत आहेत. हे प्रत्येक दृष्टीकोनातून निषेधार्ह आहे. भाजपकडून (BJP) या निर्णयाला प्रखर विरोध करण्यात आला. सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर आर्.आय.एम्.एस्.ने बंदीचा निर्णय मागे घेतला.

भाजपनेही सामाजिक माध्यमांवरून झारखंड सरकारवर निशाणा साधला. आरोग्यमंत्री इरफान अन्सारी यांच्या जातीय मानसिकतेमुळे ही बंदी घालण्यात आल्याचा आरोप भाजपचे झारखंड राज्याचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी केला. त्यांनी याचे वर्णन धार्मिक विभाजनाला चालना देणारे असे केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.