सक्रांतीला अवकाश असला तरी पंतगबाजीला सुरुवात झाली आहे. संक्रांतीला नायलाॅन मांज्या विक्री वर तसेच वापरावर बंदी आहे. तरीसुद्धा नाॅयलाॅन मांज्याची अनेक ठिकाणी विक्री होत आहे. ते पाहता नाशिकचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले असून, नागरिकांनीही सतर्कता बाळगावी असे आवाहन केले आहे.
नायलाॅन मांजा जीवघेणा
आगामी १४ जानेवारीला मकर संक्रात असून पंतगाच्या बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. पतंग, मांजा व इतर साहित्य विक्रीसाठी दुकानांमध्ये उपलब्ध झाले आहे, पण बंदी असूनही दरवर्षी छुप्या पध्दतीने नाॅयलाॅन मांजाची मोठी विक्री होते. नाॅयलाॅन मांजा अनेकांच्या जिवावर बेतला आहे. तसेच धारधार नाॅयलाॅन मांजाने अनेक पक्षी मृत्यूमुखी पडतात. वाहनावरुन जाताना नाॅयलाॅन मांजाने गळा चिरुन अनेकांना प्राणास मुकावे लागले.
( हेही वाचा :धक्कादायक! सैन्यांच्या जमिनीवरही अतिक्रमण)
कठोर कारवाई केली जाणार
मोठ्या प्रमाणात जनजागृती करुनही नाॅयलाॅनची विक्री सुरुच असते. ते पाहता जिल्हाधिकारी मांढरे यांनी संबंधित यंत्रणेला कठोर पावले उचलण्यास सांगितले आहे. तसेच संबंधित विभाग कारवाई करतीलच, परंतु नागरिकांनी आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. तसेच केव्हाही धाड टाकून मांजा साठा जप्त केला जाऊ शकत असल्याने दुकानदारांनी याचा साठा करून आर्थिक नुकसान करून घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community