अठरा वर्षांखालील अल्पवयीनांना इंस्टाग्राम वापरण्यावर बंदी?, काय सांगतो सरकारचा नवीन नियम?

मुलांना इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्वीटरसारख्या सोशल मीडिया अकाउंट बनवण्यास बंदी घालण्यात आली आहे

152
अठरा वर्षांखालील अल्पवयीनांना इंस्टाग्राम वापरण्यावर बंदी?, काय सांगतो सरकारचा नवीन नियम?
अठरा वर्षांखालील अल्पवयीनांना इंस्टाग्राम वापरण्यावर बंदी?, काय सांगतो सरकारचा नवीन नियम?

केंद्र सरकारकडून पर्सनल डेटा संरक्षण विधेयक अर्थात डेटा प्रोटेक्शन बिल अंतर्गत १८ वर्षांपेक्षा कमी अल्पवयीनांसाठी काही विशेष तरतुदी करण्यात आल्या असून, त्यात मुलांना इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्वीटरसारख्या सोशल मीडिया अकाउंट बनवण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचसोबत इतरही अनेक प्रकारच्या अटी आणि शर्ती लागू केल्या जाऊ शकतात. तर, जाणून घेऊयात नवीन बिलमध्ये मुलांसाठी कोणते नियम लागू करण्यात आले आहेत.

‘हे’ आहेत नवीन नियम

१. मुले त्यांच्या पालकांच्या परवानगीशिवाय कोणत्याही सोशल मीडियावर अकाउंट उघडू शकत नाही. म्हणजेच, सोशल मीडियावर मुले कोणत्या नावाने अकाउंट उघडतात हे पालकांना माहित असेल.

२. नवीन नियमानूसार कोणतीही टेक कंपनी मुलांचा डेटा अॅक्सेस करु शकणार नाही. त्यांचा डेटा अॅक्सेस करण्यासाठी टेक कंपनीला आधी पालकांची परवानगी घ्यावी लागेल.

३. याशिवाय कोणतीही कंपनी मुलांना केंद्रीत ठेऊन जाहिराती दाखवणार नाहीत. तसे केल्यास शिक्षेची तरतूद असेल. तसेच, मुले कोणत्याही वेबसाइटवर प्रवेश करू शकणार नाहीत. मुलांना शिक्षण, ऑनलाइन शिक्षण आणि शिष्यवृत्ती यांसारख्या वेबसाइट्स आणि अॅप्स वापरण्याची परवानगी दिली जाईल. त्याचबरोबर, काही शैक्षणिक संकेतस्थळांना विद्यार्थ्यांचा डेटा गोळा करण्यासाठी सरकारकडून परवानगी दिली जाऊ शकते.

(हेही वाचा – मुंबईकरांना बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी धरले वेठीस : पण या बसेसचे लोकार्पण करणारे आदित्य ठाकरे कुठे?)

अल्पवयीनांसाठी नवीन नियम का लागू केले?

मुलांमध्ये ऑनलाईन गेमिंग व्हिडीओ पाहण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारणामुळे अल्पवयीन मुलांचा स्क्रीन टाइम झपाट्याने वाढला आहे, याचा मेंदूवर वाईट परिणाम होत आहे. शारिरीक खेळांकडे मुलांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांची स्मरणशक्ती कमी होत असून, एकाग्रता नसल्याचीही तक्रार आहे. काही अहवालांनुसार, मुले हिंसक होण्याचे प्रमुख कारण ऑनलाइन गेमिंग आहे. भारताप्रमाणेच चीनमध्येही मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी नियम लागू केले जात आहेत. ज्यामध्ये एका दिवसात जास्तीत जास्त २ तास डिव्हाइसवर प्रवेश करण्याची परवानगी असेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.