युनेस्कोने (UNESCO) जगातील सर्व शाळांमधून ‘स्मार्ट फोन’च्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सध्या संपूर्ण जगात तंत्रज्ञानाच्या जोरावर मुलांचं भवितव्य घडवण्याचं काम सुरु आहे. या डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना जरी खूप फायदा होत असला तरीही याचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत. विशेष म्हणजे डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमधील संवाद कमी होत असल्याचं मत युनेस्कोनं आपल्या अहवालातून मांडले आहे. युनेस्कोच्या ‘ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट’ या अहवालात मुलांकडून लहान वयापासून होत असलेल्या स्मार्टफोन वापरावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
युनेस्कोच्या अहवालात नेमके काय?
संयुक्त राष्ट्राची संस्था असलेल्या युनोस्कोने (UNESCO) आपल्या अहवालात म्हटलं आहे की, डिजिटल शिक्षणात अफाट क्षमता असली तरी ते शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील प्रत्यक्ष संवादाची जागा घेऊ शकत नाही. कोणतेही तंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. शिक्षण हे मानवकेंद्रित असायला हवं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोणत्याही प्रकारच्या डिजिटल तंत्रज्ञानाकडे शिक्षणातील सहाय्यक घटक म्हणून पाहायला हवं. अशा परखड भाषेत युनेस्कोने आपले मत मांडले आहे.
(हेही वाचा – Heavy Rain : मुंबईसाठी पुढील १२ तास महत्वाचे; पुन्हा रेड अलर्ट)
युनेस्कोच्या अहवालातून जगातील देशांना सल्ला
डिजिटल शिक्षणाचा फायदा आहे. मात्र, त्यामुळे शिकताना वर्गामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवादामध्ये येणारा व्यत्यय टाळण्यासाठी आणि सायबर गुन्ह्यांपासून विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यासाठी शाळांमधून स्मार्टफोन आणि मोबाईलवर बंदी आणली पाहिजे, असं आवाहन युनेस्कोने (UNESCO) या अहवालातून जगातील देशांना केल आहे. संयुक्त राष्ट्रांची शिक्षण विज्ञान आणि सांस्कृतिक संस्था असलेल्या युनेस्कोने “ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट” या अहवालात स्मार्टफोन वापरावर चिंता व्यक्त केली आहे. स्मार्टफोन किंवा मोबाईलच्या अतिवापराचे थेट परिणाम शैक्षणिक कामगिरीवर होत असल्याने शैक्षणिक कामगिरी खालवल्याचही या अहवालात म्हटलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community