महापुरुषांविषयी केलेल्या वक्तव्यांविरोधात पुण्यात बंदची हाक; PMPML बस सेवाही राहणार बंद

111

शिवप्रेमी संघटनांकडून मंगळवारी पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार बंद राहणार आहेत. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह विविध राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. सुरक्षेसाठी 7500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. बंदमुळे PMPML सेवादेखील बंद करण्यात आली आहे.

अपमानास्पद घोषणांवर बंदी

प्रत्येक मोर्च्यात किंवा सभेत मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या जातात. त्यामुळे अनेकदा गोंधळाचे वातावरण निर्माण होते. भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याविरोधात मंगळवारी पुणे बंदमध्ये अपमानास्पद घोषणांवर बंदी घालण्यात आली आहे. या बंद दरम्यान, संपूर्ण शहरात सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी सुमारे 100 वरिष्ठ अधिकारी, 1 हजारहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.

( हेही वाचा: मुंबईत गोवरचा अजून एक बळी, चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू )

नेत्यांची उपस्थिती

या मोर्च्यात उदनराजे भोसले, छत्रपती संभाजी राजे तसेच विरोधी पक्ष नेते अजित पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आदी नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच, ते जाहीर सभेत बोलणारही आहेत. या मोर्च्यात स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.