Bandra Fire: वांद्रे येथील निवासी इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल

88
मुंबईतील वांद्रे पश्चिम भागात असलेल्या फॉर्च्यून एन्क्लेव्ह (Fortune enclave fire) नावाच्या निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर सोमवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या (Mumbai Fire Brigade) 10 गाड्यांनी तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या आगीमुळे एका 80 वर्षीय वृद्ध महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता. संबंधित महिलेला इमारतीतून बाहेर काढण्यात आले असून, जवळच्या बाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वृद्ध महिला आयसीयूमध्ये असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. (Bandra Fire)
बीएमसी अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, त्यांना सोमवारी रात्री 12:45 च्या सुमारास आपत्कालीन क्रमांकावर आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या १० बंब जवानासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. प्रसिद्ध गायक शानचाही (Singer Shan) या इमारतीच्या 11व्या मजल्यावर फ्लॅट आहे. आग लागली तेव्हा शान आणि त्याचे कुटुंब 11व्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये उपस्थित होते. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.
(हेही वाचा – Dadar Hawker : दादरमध्ये मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, बाहेरच्यांना संरक्षण)
शॉर्ट सर्किटमुळे आग
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. माहिती मिळताच मुंबई पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. काही तासांनंतर आग विझवण्यात आली.
(हेही वाचा – Weather Update: राज्यात थंडीनंतर पुन्हा पावसाळा; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?)
कुर्ला स्क्रॅप मार्केटमध्येही आग

याशिवाय मुंबईतील मानखुर्द परिसरात असलेल्या कुर्ला स्क्रॅप मार्केटमध्येही (Kurla scrap market fire) सोमवारी सायंकाळी उशिरा भीषण आग लागली. या अपघातात 30-40 गोदामे पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कुर्ल्यातील भंगार बाजाराला आग लागण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही येथे अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. 

हेही पाहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.