न्यायालयाच्या निर्देशानुसार पाली हिल (Pali Hill) येथील फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरु करण्यात आली असून आता या फेरीवाल्यांना संरक्षण देणाऱ्या दुकान मालकासह गृहनिर्माण संस्थांच्या सेक्रेटरी तसेच अध्यक्षांवरच आता महापालिका कारवाईचा बडगा उगारणार आहे. फेरीवाल्यांविरोधात कारवाई केल्यानंतर फेरीवाल्यांना दुकान मालकांसह गृहनिर्माण संस्थांकडून संरक्षण दिले जाते, त्यांचे सामान आपल्या दुकानांसह गृहनिर्माण संस्थांच्या मोकळ्या जागांमध्ये ठेवायला मदत करतात. त्यामुळे अशा मदत करणाऱ्यांवर महापालिकेच्यावतीने कडक कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. (Bandra Pali Hill Hawkers)
अनधिकृत फेरीवाल्यांना कारवाईची पूर्व कल्पना म्हणून नोटीस देण्याची गरजच नाही. फेरीवाल्यांना सार्वजनिक जागेवर विनापरवाना आणि अनधिकृतपणे व्यवसाय करण्याचा कोणताही हक्क नाही. असा महत्वपूर्ण निर्वाळा देत उच्च न्यायालयाने वांद्रे हिल रोडवरील फैरीवाल्यांना झटका दिला. पोलिसांची मदत घेऊन अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईची धडक मोहीम राबवा असे निर्देशही न्यायालयाने पालिकेला दिले. हिल रोड परिसरातील दोन रहिवाशांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत हे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या निर्देशानंतर मागील तीन दिवसांपासून हिल रोडवरील फेरीवाल्यांविरोधातील कारवाई कडक करण्यात आली आहे. (Bandra Pali Hill Hawkers)
(हेही वाचा – Abhishek Banerjee : डेव्हिड हेडलीला शिवसेना भवन फिरवणाऱ्या राजाराम रेगेला माहीम येथून अटक)
दुकानदार, खासगी इमारतींमधून फेरीवाल्यांना संरक्षण
एच पश्चिम विभागाच्या महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या भागातील फेरीवाल्यांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येते. परंतु कारवाई केल्यानंतर पाठ फिरताच पुन्हा फेरीवाले त्याठिकाणी येतात. त्यामुळे मागील वर्षी महापालिकेने ज्या ज्या खासगी इमारतींच्या बाहेरील बाजुस फेरीवाले बस्तान मांडून बसतात तसेच या खासगी इमारतींमध्ये तसेच त्यांच्या मोकळ्या जागांमध्ये कारवाई दरम्यान आपले सामान नेऊन ठेवतात. (Bandra Pali Hill Hawkers)
याला आळा घालण्यासाठी महापालिका एच पश्चिम विभागाच्यावतीने एक वर्षांपूर्वी खासगी इमारतींच्या गृहनिर्माण संस्थांचे सचिव तसेच अध्यक्ष यांच्या नावाने नोटीस जारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, कोणत्याही प्रकारचे फेरीवाल्यांना संरक्षण देण्यात येऊ नये अशाप्रकारची सुचना करून त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतरही काही दुकानदार, खासगी इमारतींमधून फेरीवाल्यांना संरक्षण दिले जात असल्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे एक वर्षांपूर्वी दिलेल्या नोटीसच्या पार्श्वभूमीवर पाली हिलमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई करताना ज्या दुकानाच्या जागेमध्ये तसेच खासगी इमारतीच्या आवारात फेरीवाल्यांचे साहित्य आढळून आल्यास त्यांच्यावरही आता कारवाई केली जाईल. त्यामुळे फेरीवाल्यांवरील कारवाईचा फास अधिक आवळण्यासाठी इतरांवरही कारवाई तीव्र केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (Bandra Pali Hill Hawkers)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community