मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वांद्रे येथे 27 वर्षीय महिलेचा सोमवारी, १० जुलै रोजी दुपारी मृतदेह सापडला. समुद्रात बुडून त्या महिलेचा मृत्यू झाला.
या महिलेचे नाव ज्योती सोनार असून ती वांद्रे येथील रहिवासी आहे. पोलिसांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी पती, मुले आणि इतर कुटुंबीयांसह बँडस्टँडला आली होती. हे कुटुंब आधी वांद्रे किल्ल्यावर गेले होते आणि नंतर खडकांवर वेळ घालवण्यासाठी बसले. त्याठिकाणी हे कुटुंब सेल्फी घेऊ लागले, त्याचवेळी एक उंच लाट आली आणि त्यांना पाण्यात ओढले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी पतीला वाचवले. मात्र, महिला पाण्यामध्ये बेपत्ता झाली. पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून शोधमोहीम सुरू केली. गोताखोरांची मदत घेऊन अखेर त्या महिलेला शोधण्यात पोलिसांना यश आले. रविवारी संध्याकाळी जुहू आणि वर्सोवा समुद्रकिनारे मोठ्या भरतीच्या इशाऱ्यामुळे नागरिकांसाठी बंद करण्यात आले होते. IMD मुंबईने 9 जुलै रोजी “शहर आणि उपनगरात ढगाळ आकाशासह मध्यम पावसाचा” अंदाज वर्तवला होता. रविवारी संध्याकाळी पोलिस अधिकारी लोकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याची सूचना देताना दिसत होते.
(हेही वाचा Eknath Shinde : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले होते?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितली पडद्यामागील कहाणी)
Join Our WhatsApp Community