Bandra Station : वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीत ९ जण जखमी तर, दोघांची प्रकृती चिंताजनक!

212
Bandra Station : वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीत ९ जण जखमी तर, दोघांची प्रकृती चिंताजनक!
Bandra Station : वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीत ९ जण जखमी तर, दोघांची प्रकृती चिंताजनक!

मुंबईत बांद्रा रेल्वे स्थानकात (Bandra Station) चेंगराचेंगरीची घटना घडली असून यात ९ जण जखमी झाले आहेत. रविवारी (२७ ऑक्टो.) पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान ही घटना घडली. वांद्रे गोरखपूर एक्सप्रेसने (Bandra-Gorakhpur Express) जाण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत चेंगराचेंगरी झाली. यात जखमी झालेल्यांना भाभा रुग्णालयात दाखल केले आहे. बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. (Bandra Station)

(हेही वाचा-दिल्ली, मुंबई, जयपूरसह ५ शहरांमध्ये EDची छापेमारी; कोल्डप्ले आणि दिलजीतचा कॉन्सर्ट EDच्या रडारवर)

दिवाळीच्या सुट्टीमुळे गाड्यांना मोठी गर्दी आहे. गोरखपूर एक्सप्रेसमधून जाण्यासाठी बांद्रा स्टेशनवर जमलेल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि यानंतर चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळत आहे. शबीर रहमान, परमेश्वर गुप्ता, रविंद्र छुमा, रामसेवक प्रजापती, संजय कांगेय, दिव्यांशू यादव, मोहम्मद शेख, इंद्रजीत साहनी, नूर शेख अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे. (Bandra Station)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.